घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटचीनला नुकसान भरपाई करावीच लागेल; जर्मनीनं पाठवलं अब्जावधींचं बील

चीनला नुकसान भरपाई करावीच लागेल; जर्मनीनं पाठवलं अब्जावधींचं बील

Subscribe

कोरोना बाधित देशांपैकी अमेरिका, स्पेन, इटली आणि फ्रान्स नंतर जर्मनी पाचव्या क्रमांकावर आहे. जर्मनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही नुकसान भरपाई चीनने भरुन द्यावी असं जर्मनीने म्हटलं आहे.

ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या पाऊलावर पाऊल टाकत जर्मनीने देखील कोरोना विषाणूमागे चीनचं कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने तर उघडपणे धमकी दिली असून आता जर्मनीनेही चीनकडून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अमेरिकेव्यतिरिक्त बर्‍याच युरोपियन देशांप्रमाणेच जर्मनीदेखील कोरोना विषाणूचा प्रसार चीनने केल्याचा आरोप आहे. जर्मनीमध्ये आतापर्यंत १ लाख ४५ हजार ७४३ कोरोनाचे रुग्ण आहेत. तर ४ हजार ६४२ लोक मरण पावले आहेत. कोरोना बाधित देशांपैकी अमेरिका, स्पेन, इटली आणि फ्रान्स नंतर जर्मनी पाचव्या क्रमांकावर आहे. जर्मनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही नुकसान भरपाई चीनने भरुन द्यावी असं जर्मनीने म्हटलं आहे.

कोरोना विषाणूमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी जर्मनीने चीनला १४९ अब्ज युरोचे (१३० अब्ज पाऊंड) बिल पाठवलं आहे. त्यापैकी २७ अब्ज युरो पर्यटन, ७.२ अब्ज युरो चित्रपट उद्योग, ५० अब्ज युरो जर्मन एअरलाइन्स आणि छोट्या व्यवसायाचे नुकसान, असं बिल चीनला पाठवलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; अमेरिकेचा चीनला इशारा


 

- Advertisement -

जर्मनीने कोरोना विषाणूमुळे झालेलं आपलं सर्व नुकसान मोजलं आहे, आणि बिल चीनला पाठवलं आहे. एकिकडे जर्मनीने हे बिल पाठवलं असताना दुसरीकडे अमेरिका तपास पथक पाठवण्याच्या तयारीत आहे. रविवारी व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की कोरोना वुहानपासून सुरू झाला आहे. हा प्राणघातक विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून तयार झाला होता की नाही याची अमेरिका चौकशी करत असल्याचं ट्रम्प म्हणाले. यासाठी आम्हाला चीनला जायचं आहे. यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी चीन जबाबदार आढळल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तथापि, चीनकडून वारंवार हे आरोप फेटाळले जात आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -