घरदेश-विदेशBakrid 2020: कुर्बानी द्यायची असेल तर मुलांची द्या, भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

Bakrid 2020: कुर्बानी द्यायची असेल तर मुलांची द्या, भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

Subscribe

गाझियाबादमधील लोणी येथील भारतीय जनता पक्षाचे आमदारांनी बकरी ईदचे कुर्बानी देण्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

गाझियाबादमधील लोणी येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी बकरी ईदचे कुर्बानी देण्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आमदार नंदकिशोर गुर्जर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी देऊ नका, कुर्बानी द्यायची असल्यास आपल्या मुलांची द्या. कुर्बानी देणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर म्हणाले की, सनातन धर्मात ज्या मार्गाने पूर्वी बळी दिले गेले होते, आता नारळ फोडून त्या जागी बळी दिला जातो तर बकरी किंवा प्राण्याचा बळी दिला जात नाही, त्याप्रमाणे मी इस्लामच्या धर्म मानणाऱ्यांना विनंती करतो की, तुम्ही देखील पवित्र गोष्टींचा तसेच अशाप्रकारचा बळी देऊ नका. भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर म्हणाले की, जर मला कोणी म्हणाले मला कुर्बानी द्यायची आहे तर ती आपल्या मुलाची द्या. निष्पाप प्राण्यांना ठार मारणं तसेच त्यांचा बळी देणं आणि त्यांना खाणं योग्य नाही. तर पुढच्या जन्मात, त्यांना प्राणी बनावं लागेल आणि लोकं ते खातील, निसर्गाचा नियमच आहे, जो जसं वर्तन करेन त्याला तसे भोगावे लागते.

- Advertisement -

दरम्यान देशात कोरोना महामारीचा प्रसार सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकार लोकांना धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आवाहन करत आहे. तसेच बकरी ईद आणि इतर सण घरी साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, परंतु काही लोक सामुहिक नमाज आणि कुर्बानी यावर ठाम आहेत. संभलचे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क म्हणाले होते की, त्यांच्या नमाज अदा करण्यावर कोणीही बंदी घालू शकत नाही. मुस्लिमांसाठी हा एक मोठा उत्सव आहे. या दिवशी मुस्लिम बाजारात जाऊन जनावरे खरेदी करतात पण आता जनावरांच्या बाजारपेठा दिसत नाहीत. अशा परिस्थितीत एखादा सण कसा होऊ शकतो? त्यामुळे बंदी घालणं योग्य नाही

सपाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांना धमकी देत ​​भाजपचे आमदार संगीत सोम म्हणाले होते की, जर सपाचे खासदार सहमत झाले नाहीत तर ज्याप्रकारे आजम खानची ईद जेलमध्ये साजरी झाली होती तशी त्यांची बकरी ईदही जेलमध्ये साजरी केली जाईल. दरम्यान संगीत सोम म्हणाले की बकरी ईदच्या दिवशी कोणी असे म्हटले आहे की बकरी कापून प्राण्याचा बळी देऊन सण साजरा करा. पण, इतर भाज्या खाऊन देखील सण साजरा केला जाऊ शकतो.


हेही वाचा – श्रद्धा…अंधश्रद्धा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -