घरदेश-विदेशGlenmark फार्माने कोरोना उपचारासाठी लाँच केले औषध! DCGI ने दिली मान्यता

Glenmark फार्माने कोरोना उपचारासाठी लाँच केले औषध! DCGI ने दिली मान्यता

Subscribe

कोविड -१९ च्या रुग्णांच्या उपचारांसाठी फॅबीफ्लू फॅविपिरावीर (Favipiravir) हे औषध म्हणून वापरता येईल.

कोविड -१९ वरील उपचारासाठी फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) लाँच केले आहे. हे औषध कोविड-१९ च्या रूग्णांसाठी आहे. तसेच ज्या रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असतील अशा रूग्णांच्या उपचाराकरता हे औषध वापरले जाईल, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी सांगितले आहे.

मुंबईतील या फार्मा कंपनीला औषध निर्मितीसाठी व बाजारपेठेत ते उपलब्ध करण्यासाठी शुक्रवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून शुक्रवारी मान्यताही देण्यात आली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, कोविड -१९ च्या रुग्णांच्या उपचारांसाठी फॅबीफ्लू फॅविपिरावीर (Favipiravir) हे औषध म्हणून वापरता येईल.

- Advertisement -

ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ग्लेन सलधाना म्हणाले की, भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची घटना वेगाने वाढत आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर खूप दबाव आला आहे, मात्र अशावेळी ही मान्यता देण्यात आली असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

कंपनीला आशा आहे की, फॅबीफ्लू (FabiFlu) सारख्या प्रभावी औषधं उपचारांची उपलब्धता झाल्यामुळे हा दाब कमी होण्यास नक्की मदत होईल. तसेच भारतातील कोरोना रूग्णांना त्वरित व वेळेवर उपचारांचा पर्याय म्हणून हे औषध उपलब्ध होईल.


WHO चा इशारा: ‘कोविड-19 चा प्रसार वेगाने होतोय, जग धोकादायक टप्प्यावर’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -