घरक्रीडाराष्ट्रकुल स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या 'या' महिला क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा

राष्ट्रकुल स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या ‘या’ महिला क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा

Subscribe

राष्ट्रकुल स्पर्धेचा आज चौथा दिवस असून सर्व खेळाडू उत्तम खेळी करत आहेत. अनेक खेळाडू विजयी शिखर गाठत आहेत, तर काही खेळाडू अयशस्वी ठरत आहेत. मात्र, या राष्ट्रकुल स्पर्धेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाच्या चाहत्यांशी एक महत्वाची बातमी आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेचा आज चौथा दिवस असून सर्व खेळाडू उत्तम खेळी करत आहेत. अनेक खेळाडू विजयी शिखर गाठत आहेत, तर काही खेळाडू अयशस्वी ठरत आहेत. मात्र, या राष्ट्रकुल स्पर्धेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाच्या चाहत्यांशी एक महत्वाची बातमी आहे. वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटिन (Deandra Dottin) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (west indies allrounder Deandra dottin announces retirement from international cricket commonwealth games)

डिएंड्रा डॉटिनने सांगितले की सध्याचे संघाची संस्कृती आणि वातावरण हे तिच्या करिअरसाठी पुढे नेणारे नाही. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वात वेगवान सतक ठोकणारी ३१ वर्षीय डिएंड्रा डॉटिनने ट्विटरवरून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. डिएंड्रा डॉटिनने सांगितले की, माझ्या क्रिकेट करिअरदरम्यान अनेक अडथळे आले जे मला दूर करावे लागले. मात्र, संघाचे सध्याचे वातावरण माझ्या करिअरला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते जिवंत ठेवण्यासाठी अनुकूल नाही.

- Advertisement -

“डिएंड्रा डॉटिनने सांगितले, खूप दुखाने तसेच पश्चातापाने मला असे वाटते की आता संघाची संस्कृती आणि तेथील वातारवणात राहण्यास मी सक्षम नाह कारण यामुळे माझ्या कामगिरीवर परिणाम होईल”, असे डिआंड्रा डॉटिन हिने सांगितले.

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये बारबाडोसच प्रतिनिधित्व

- Advertisement -

डिआंड्रा डॉटिनने बारबाडोसकडूनही निवृत्ती घेतली आहे. ती सध्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये बारबाडोसच प्रतिनिधित्व करत आहे. तसेच, जगभरात डोमेस्टिक क्रिकेट खेळणार असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, डिएंड्रा डॉटिन ही वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू आहे.

२००८ मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने १२४ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि १४३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. डिआंड्रा डॉटिनने वनडेमध्ये ३०.५४ च्या सरासरीने ३७२७ धावा केल्या. यामध्ये ३ शतकांचा समावेश आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर २६९७ धावांची नोंद आहे. यामध्ये तिने २ शतक झळकावली आहेत.


हेही वाचा – भारत वि. वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -