घरCORONA UPDATEकोविशील्डच्या दोन डोसांमध्ये तीन महिन्यांचे अंतर

कोविशील्डच्या दोन डोसांमध्ये तीन महिन्यांचे अंतर

Subscribe

देशात कोरोनाची लस घेताना लसीच्या दोन डोसांमध्ये किमान दोन महिन्यांचे अंतर असणे गरजेचे आहे तरच त्याचा ९० टक्के परिणाम दिसून येईल.

कोरोना लसीकरणाचा चांगला प्रभाव हवा असल्यास दोन लसीच्यामध्ये तीन महिन्यांचा अंतर ठेवावे लागणार आहे. सीरम इस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला आणि अमेरिका, ब्रिटनमध्ये यांच्या निकषांच्या आधारे  बातमी प्रदर्शित केली त्यात असे सांगितले आहे की, देशात कोरोनाची लस घेताना लसीच्या दोन डोसांमध्ये किमान दोन महिन्यांचे अंतर असणे गरजेचे आहे तरच त्याचा ९० टक्के परिणाम दिसून येईल.

ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या निर्णयावर आपली सहमती दर्शवली आहे. त्यांनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला एक लिखित आदेशही पाठवण्यात आला आहे. वय वर्ष १०च्या पुढच्या लोकांना कोविशील्ड ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर चार आठवड्यांनी त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येईल. लसीच्या परिणाम लक्षात घेता १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस देण्यासाठी सीरम इंस्टिट्यूडला परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

१८ वर्षांवरील लोकांवरील लोकांना कोविशील्ड ही लस देण्यात येणार आहे. तर भारत बायोटेकची लस १२ वर्षापर्यंत किंवा त्याहून जास्त वय असलेल्या देण्यात येणार आहे. कमी वय असलेल्या मुलांसाठी कोरोना लसीचे परिक्षण झालेले नाही. त्यामुळे भारत सरकार लहान मुलांसाठी वेगळ्या परिक्षणाचा विचार करत आहे. सध्याची परिस्थिती पाहता १२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा लसीकरणात समावेश करण्यात आलेला नाही.


हेही वाचा – Corona Vaccine : मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्तात येणार कोरोना लस!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -