घरदेश-विदेशराम मंंदिरावरून बाबा रामदेवांचा सरकारला इशारा

राम मंंदिरावरून बाबा रामदेवांचा सरकारला इशारा

Subscribe

राम मंदिरासाठी सरकारनं कायदा करावा अशी मागणी योगगुरू बाबा रामदेव यांनी केली आहे. कायदा न केल्यास लोक स्वत:च राम मंदिराची उभारणी करतील असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून आता भाजप सरकारला योग गुरू बाबा रामदेव यांनी लक्ष्य केलं आहे. राम मंदिराच्या मुद्यावरून लोकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यामुळे सरकारनं आता राम मंदिरासाठी कायदा करावा अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली आहे. कायदा न केल्यास लोक स्वत: राम मंदिराची उभारणी करतील. त्यामुळे देशातील वातावरण बिघडेल असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. सध्या देशात राम मंदिराविरोधात कुणीच नाही. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधव हे रामाचेच वंशज असल्याचं यावेळी बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेनंतर आता बाबा रामदेव यांनी देखील राम मंदिराच्या मुद्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यामुळे भाजपवर दिवसेंदिवस दबाव वाढत आहे. पण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र याउलट भूमिका घेतल्याचं पाहायाला मिळत आहे.

वाचा – राम मंदिरासाठी अध्यादेश काढता येणार नाही – अमित शहा

काय म्हणाले अमित शहा

अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणं ही आमची प्राथमिकता आहे. पण, त्यासाठी अध्यादेश काढला जाणार नाही असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. कारण हे सारं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीतमध्ये शहा यांनी ही माहिती दिली आहे. राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्याबाबत आता अद्यादेश काढला जाणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. राम मंदिर हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पण, त्यासाठी संविधानिक मार्ग शोधला जाईल असं देखील अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं. १९९२ साली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर देशाच्या राजकारणात राम मंदिराचा मुद्दा अद्याप देखील धगधगत आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं राम मंदिरासाठी अध्यादेश काढा आणि जमिनीचं अधिग्रहण करा अशी मागणी यापूर्वीच केली आहे. पण, अमित शहा यांनी मात्र राम मंदिराचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं अध्यादेश काढता येणार नाही असं म्हटलं आहे.

- Advertisement -

राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेनं देखील चलो अयोध्येचा नारा दिला आहे. हजारो शिवसैनिकांसह उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजप समोरच्या अडचणी देखील वाढल्या आहेत.

वाचा – उद्धव ठाकरे जनसंवादच्या माध्यमातून अयोध्येत भाषण करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -