घरदेश-विदेशराम मंदिरासाठी अध्यादेश काढता येणार नाही - अमित शहा

राम मंदिरासाठी अध्यादेश काढता येणार नाही – अमित शहा

Subscribe

राम मंदिराचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्याबाबत अध्यादेश काढला जाणार नाही असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे.

देशातील राजकारण सध्या राममंदिराभोवतीच फिरताना दिसतंय. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानं राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाऊ लागला आहे. शिवसेनेनं तर भाजपची कोंडी करण्यासाठी आता थेट अयोध्या गाठलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये देखील कुठेतरी अस्वस्थता दिसत आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढा अशी मागणीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यापूर्वी केली आहे. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही मागणी भाजपनं फेटाळून लावली आहे असं म्हणावं लागेल. कारण, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणं ही आमची प्राथमिकता आहे. पण, त्यासाठी अध्यादेश काढला जाणार नाही असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. कारण हे सारं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीतमध्ये शहा यांनी ही माहिती दिली आहे. राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्याबाबत आता अद्यादेश आणला जाणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. राम मंदिर हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पण, त्यासाठी संविधानिक मार्ग शोधला जाईल असं देखील अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं. १९९२ साली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर देशाच्या राजकारणात राम मंदिराचा मुद्दा अद्याप देखील धगधगत आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं राम मंदिरासाठी अध्यादेश काढा आणि जमिनीचं अधिग्रहण करा अशी मागणी यापूर्वीच केली आहे. पण, अमित शहा यांनी मात्र राम मंदिराचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं अध्यादेश काढता येणार नाही असं म्हटलं आहे.

वाचा – ‘भाजपला राम मंदिर बांधायची इच्छा नाही’

शिवसेनेचा अयोध्येत राम नामाचा गजर

राम मंदिराच्या मुद्यावरून आता हजारो शिवसैनिक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब अयोध्येमध्ये दाखल झाले आहे. आज संध्याकाळी शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती केली आहे. तर उद्या अर्थात रविवारी २५ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे रामाचं दर्शन घेतील. शिवसेनेच्या चलो अयोध्येच्या नाऱ्यामुळे भाजपची मात्र चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे.

वाचा – उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील तेव्हा राम मंदिराचा प्रश्न विचारा – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -