बाबो! आजीचे वेट लिफ्टिंग पाहिलंत का?, सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा

सोशल मीडियावर (social media) बऱ्याचदा नवनवीन व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. काही मनोरंजनात्मक असतात, तर काही भावनिक असतात. हेच व्हिडीओनंतर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांच्या पसंतीस उतरतात.

सोशल मीडियावर (social media) बऱ्याचदा नवनवीन व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. काही मनोरंजनात्मक असतात, तर काही भावनिक असतात. हेच व्हिडीओनंतर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांच्या पसंतीस उतरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आजी नातवाने दिलेले वेट लिफ्टिंगचे चॅलेंज पुर्ण करताना दिसते आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 60 हजारापेक्षा अनेक लोकांनी पाहिला असून, 65 हजार कमेंट्स मिळाल्या आहेत.

आजीच्या वेट लिफ्टिंगचा हा व्हिडीओ punjabi_industry__ नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत आजीचा नातू आपल्या फिटनेससाठी (fitness) गच्चीवर व्यायाम करत असतो. तो पुश-अप्स मारतो आणि वेट लिफ्टिंग करत असतो. त्यावेळी त्याची आजी काही कामानिमित्त गच्चीवर येते. आजीला आलेले पाहून नातू (grandson) तिला हसत-हसत चॅलेंज देतो. तिला वेट लिफ्टिंग करायला सांगतो. त्यावेळी नातवासाठी काहीपण अशा जिद्दीने आजी ते चॅलेंज स्विकारते. पुढच्या काही सेकंदातच आजी नातवाजवळ जाते आणि वजन उचलते. आजीला वेटलिफ्टिंग करताना पाहून नातवाच्या पायाखालची जमिन सरकते.

दरम्यान, आजी आणि नातवाचे घट्ट असलेले नाते या व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळते. आजींनी जर एखादी गोष्टी मनात ठरवली तर त्या आपल्या नातवांसाठी आकाश पाताळ एक करतात आणि ती गोष्ट पूर्ण करतात. हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. तसेच, आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील शेअर करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्स वाचण्यासारख्या आहेत.


हेही वाचा – केअरटेकरचा जीव वाचवण्यासाठी हत्तीने घेतली धाव; व्हिडीओ होतोय व्हायरल