घरताज्या घडामोडीपुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?, दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं

पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?, दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या २२ मे रोजी पुण्यात (Pune) जाहीर सभा होणार आहे. याआधी २१ मे रोजी राज ठाकरेंच्या सभेचं नदीपात्रात आयोजन करण्यात आलं होतं. पण पावसाची शक्यता असल्यामुळे त्यांनी ही सभा रद्द केली. त्यानंतर त्यांनी सभेचं नियोजन बदलून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी १० वाजता ठेवलं आहे. त्यामुळे ते नक्की काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?, असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मनसेला (MNS) पुन्हा एकदा डिवचलं आहे.

पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?

दीपाली सय्यद यांनी ट्विट करत वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर निशाणा साधला आहे. सभा रद्द करून कोणताच मुद्दा शेवट पर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राज साहेबांनी कायम ठेवली त्याबद्दल खंत आहे. पण पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का हा यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल कि नाही, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.

- Advertisement -

मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले

पावसाचं कारण सांगून मैदान सोडले. भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले. अयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले, असं ट्विट दीपाली सय्यद यांनी करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे

- Advertisement -

राज ठाकरेंच्या सभेच्या संदर्भात आयोजित बैठकीत निमंत्रण न दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात वाद झाला.

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेला राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, सध्या हा दौरा स्थगिती करुन भविष्यात राज ठाकरे यांच्याकडून अयोध्या दौऱ्याची नवी तारीख जाहीर केली जाऊ शकते. याबाबत मनसेकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला होता. यासाठी ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही, अशी गर्जना बृजभूषण सिंह यांनी केली होती.


हेही वाचा :मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले, दीपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -