घरमनोरंजन'हे' अभिनेते आहेत खरे 'रिअल लाईफ हिरो', कोणी कर्नल तर कोणी मेजर

‘हे’ अभिनेते आहेत खरे ‘रिअल लाईफ हिरो’, कोणी कर्नल तर कोणी मेजर

Subscribe

बॉलिवूडमध्ये (bollywood) आजही अनेक देशभक्तीवर आधारित चित्रपट बनले आहेत आणि अजूनही बनत आहेत. यात नुकताच रिलीज झालेला आयुष्मान खुरानाचा ‘अनेक’ हा चित्रपटही याच मुद्द्याशी संबंधित आहे. आयुष्मान ‘अनेक’मध्ये अंडरकॉप ऑफिसरची भूमिका साकारली आहे, यापूर्वी सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या स्टार्सनी असे चित्रपट तयार केले होते. पण तुम्हाला माहित नसेल की इंडस्ट्रीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही देशाची सेवा केली आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील खरे ‘रिअल लाईफ हिरो’ नेमके कोण आहेत त्याच्याविषयी तुम्हाला सांगणार आहोत.

मोहन लाल (Mohan Lal)

मोहन लाल
मोहन लाल

दक्षिणेतील सुपरस्टार मोहनलाल हे ‘टेरिटोरियल आर्मी’मध्ये लेफ्टनंट कर्नलची मानद रँक मिळवणारे पहिले आणि एकमेव भारतीय अभिनेते आहेत. मोहनलाल यांनी 2009 मध्ये अभिनेता झाल्यानंतर ही रँक गाठली.

- Advertisement -

रेहमान (Rehman)

 रेहमान
रेहमान

40 ते 60 च्या दशकात इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रेहमान यांनी ‘रॉयल ​​इंडियन एअर फोर्स’मध्ये पायलट म्हणून काम केले आहे.

गुफी पेंटल (Goofy paint)

गुफी पेंटल
गुफी पेंटल

बी. आर. चोप्राच्या ‘महाभारत’ मालिकेतील लोकप्रिय पात्रांपैकी शकुनी मामा ही भूमिका गुफी पेंटलने केली होती. अभिनेता गुफी पेंटलच्या अभिनयाने लोकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. पण त्यांनी भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून काम केले आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल.

- Advertisement -

आनंद बक्षी (Anand Bakshi)

आनंद बक्षी
आनंद बक्षी

दिवंगत गीतकार आनंद बक्षी हे त्यांच्या सुंदर गाण्यांसाठी ओळखले जातात, परंतु आनंद बक्षी यांनी दोन वर्षे रॉयल इंडियन नेव्हीमध्ये कॅडेट म्हणूनही काम केले.

बिक्रमजीत कंवरपाल (Bikramjit Kanwarpal)

बिक्रमजीत कंवरपाल
बिक्रमजीत कंवरपाल

दिवंगत अभिनेते बिक्रमजीत कंवरपालला तुम्ही ‘मर्डर 2’, ‘जब तक है जान’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. पण ते भारतीय लष्कराचा निवृत्त मेजर होता हे फार कमी लोकांना माहीत असेल.


Cannes 2022 : Aditi Rao Hydari सब्यसाने डिझाईन केलेल्या साडीत Deepika पेक्षा दिसतेय भारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -