घरदेश-विदेशहिरवा धुमकेतू ५० वर्षांनी जाणार पृथ्वीच्या जवळून, उघड्या डोळ्यांनी पाहता येणार?

हिरवा धुमकेतू ५० वर्षांनी जाणार पृथ्वीच्या जवळून, उघड्या डोळ्यांनी पाहता येणार?

Subscribe

Green comet | हा विशेष धूमकेतू 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ओडिशासह देशातील अनेक भागात दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञ या घटनेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Green comet | रात्री दिसणारा धुमकेतू तुम्ही पाहिला असेल. जो सामान्यपणे पांढऱ्या रंगाचा दिसतो. पंरतु तुम्ही कधी हिरव्या रंगाचा धुमकेतु पाहिला आहे का? दर ५० हजार वर्षांनी हा धुमकेतू दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार C/2022 E3 एक धुमकेतू जो शेवटचा हिमयुगात दिसला होता, तो आता पुन्हा दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही हा धुमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहु शकता.

धूमकेतू हे गोठलेल्या वायूंचे, खडकांचे आणि धूळांचे वैश्विक स्नोबॉल आहेत जे सूर्याभोवती फिरतात. जेव्हा धूमकेतू सूर्याजवळ येतो तेव्हा तो तापतो आणि त्याच्या पृष्ठभागाचे बर्फात रुपांतर होते. जे बहुतेक ग्रहांपेक्षा अधिक प्रकाशमय असतात. हा विशेष धूमकेतू 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ओडिशासह देशातील अनेक भागात दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञ या घटनेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

Zwicky Transient Facility यांना मार्च २०२२ मध्ये या धुमकेतुविषयी कळले होते. त्यामुळे त्यांच्या नावारूनच या धुमकेतूला C/2022 E3 (ZTF) असे नाव देण्यात आले. हा धूमकेतू 2 फेब्रुवारीच्या आसपास पृथ्वीच्या सर्वात जवळ येण्याचा अंदाज आहे. द गार्डियनने अहवाल दिला की हिरवा धूमकेतू पृथ्वीपासून 2.5 प्रकाश मिनिटांच्या अंतरावर असू शकतो, म्हणजे “फक्त” 27 दशलक्ष मैल.

उत्तर गोलार्धातील निरीक्षकांना धूमकेतू सकाळच्या आकाशात दिसेल, कारण तो जानेवारीमध्ये वायव्येकडे वेगाने सरकत गेला. त्यामुळे हा धुमकेतू फेब्रुवारीच्या सुरुवातीला दक्षिण गोलार्धात दृश्यमान होईल. Weather.com नुसार, भारतीय आकाशात, वायव्य दिशेकडे पाहताना, एखाद्याला ते क्षितिजापासून 16° वर बूटेस नक्षत्रात दिसू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -