घरक्राइमGujarat Godhra Riots: गोध्रा घटनेतील 8 दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Gujarat Godhra Riots: गोध्रा घटनेतील 8 दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Subscribe

गुजरातमधील गोध्रा येथे 2002 साली साबरमती एक्सप्रेस ट्रेनला आग लावल्याप्रकरणी आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने 8 दोषींना जामीन मंजूर केला आहे. हे सर्व दोषी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती आणि दोषींनी यापूर्वी 17 ते 20 वर्षांची शिक्षा भोगली आहे.

गुजरातमधील गोध्रा येथे 2002 साली साबरमती एक्सप्रेस ट्रेनला आग लावल्याप्रकरणी आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने 8 दोषींना जामीन मंजूर केला आहे. हे सर्व दोषी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती आणि दोषींनी यापूर्वी 17 ते 20 वर्षांची शिक्षा भोगली आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील काही दोषींचे जामीन अर्ज फेटाळले होते. याचिका फेटाळल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती, मात्र या शिक्षेचे गुजरात हायकोर्टाने ती जन्मठेपेत रुपांतर केले होते. ( Gujarat Godhra Riots Supreme Court grants bail to 8 convicts in Godhra Riots )

या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठाने निर्णय देताना सांगितले की, जामिनाच्या अटी कनिष्ठ न्यायालये ठरवतील. दोषींचे वकील संजय हेगडे यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामिनावर सोडण्याचे आवाहन केले आहे. अशा स्थितीत त्याला जामीन मिळणार की नाही याचा निर्णय कनिष्ठ न्यायालय घेणार आहे.

- Advertisement -

कनिष्ठ न्यायालयाने 11 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गुजरात हायकोर्टाने या प्रकरणी फाशीची शिक्षा कमी करताना ३१ जणांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यांच्यापैकी काहींनी त्यांच्या दोषी आणि शिक्षेविरोधातील अपील निकाली लागेपर्यंत जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी मोठा निकाल दिला आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: गुजरातच्या नरोडा दंगलप्रकरणी माया कोडनानी, बाबू बजरंगीसह 86 जणांची निर्दोष मुक्तता )

विशेष म्हणजे 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा स्टेशनवर साबरमती ट्रेनच्या एका डब्याला आग लागली होती. या घटनेत एकूण 59 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारीला राज्यात बंदची हाक देण्यात आली होती. या बंददरम्यान अहमदाबाद शहरातील नरोडा परिसरात हिंसाचार झाला होता, या घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात गुजरातमधील नरोडा गाव दंगलप्रकरणी विशेष न्यायालयाने 68 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यामध्ये गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजपा नेत्या माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -