घरमहाराष्ट्रश्री सदस्यांच्या मृत्यूवरून प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर घणाघात, म्हणाले...

श्री सदस्यांच्या मृत्यूवरून प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर घणाघात, म्हणाले…

Subscribe

मेलेल्याच्या मड्यावरचं लोणी खाणारी संजय राऊतांची औलाद असल्याचे म्हणत प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणावरून रोष व्यक्त केला आहे.

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमात उष्माघातामुळे १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. तर विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे. तसेच घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुद्धा विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. पण याबाबत भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. मेलेल्याच्या मढ्यावरचं लोणी खाणारी संजय राऊतांची औलाद असल्याचे म्हणत प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणावरून रोष व्यक्त केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

- Advertisement -

यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही गोष्टीचे विकृतीकरण करणं, विपर्यास करणं आणि आपला भोंगा चालू ठेवणं, एवढचं संजय राऊत यांना सकाळचे काम आहे. तर अशा प्रकारे मृत्यूचे राजकारण करणे होणे हे दुर्दैवी आहे. स्वतः आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या मृत्यूचे राजकारण करू नये, असे सांगितले आहे. तर झालेली गोष्ट दुर्दैवी आहे, हे सरकारने मान्य केलेले आहे. त्यासंदर्भात सरकार संवेदनशील आहे, असे प्रवीण दरेकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

पण मेलेल्याच्या मड्यावरचं लोणी खाणारी संजय राऊतांची औलाद असल्याकारणाने त्याठिकाणी अशा प्रकारचे कोणतेही टोकाचे भाष्य करणे संजय राऊतांचे चालू असते, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर रोष व्यक्त केला. संजय राऊत यांनी श्री सदस्यांच्या मृ़त्यूप्रकरणी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमात १४ नाही तर ५० श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले होते. तर त्यांच्या या विधानाच्या विरोधात आमदार संजय शिरसाट यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार देखील दाखल केलेली आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार निर्णय घेईल
मराठा आरक्षणा संदर्भातील राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने गुरूवारी फेटाळून लावली. याबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, या संदर्भात आता महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल. कोणत्याही समाजात वाद होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. तर सर्व समाजांचे आरक्षण सुरक्षित ठेवून मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण देण्यात येईल, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गंभीर असल्याचे दरेकर यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – दादा, ज्याचं जळतं… पत्राद्वारे सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर खरमरीत टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -