घरदेश-विदेशमोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी ओरेवा ग्रुपच्या मालकाला ठरवलं आरोपी; १२६२ पानी आरोपपत्र दाखल

मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी ओरेवा ग्रुपच्या मालकाला ठरवलं आरोपी; १२६२ पानी आरोपपत्र दाखल

Subscribe

मोरबी पूल दुर्घटनेनंनतर तीन महिन्यांनी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मोरबी पुल दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोप पोलीस कोठडीत असून दहावा आरोपी म्हणून ओरेवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

Morbi Bridge Collapse Chargesheet : गेल्या काही दिवसांपूर्वी गुजरातमधील मोरबी भागातील मच्छू नदीत एक केबल पूल कोसळल्याची घटना घडली होती. यात १३५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. एकूण १२६२ पानांचं हे आरोपपत्र असून, यात पुलाचे संचालन करणाऱ्या ओरेवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे आता जयसुख पटेल यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. अशा स्थितीत जयसुख पटेल यांनी 20 जानेवारी रोजी मोरबीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळली होती.

मोरबी पूल दुर्घटनेनंनतर तीन महिन्यांनी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक पी. एस. जाला यांनी मोरबी सत्र न्यायालयात हे १२६२ पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. मोरबी पुल दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपी पोलीस कोठडीत असून, दहावा आरोपी म्हणून ओरेवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर काँग्रेसने भाजपवर ओरेवाच्या मालकाला वाचवल्याचा आरोप केला होता.

- Advertisement -
आतापर्यंत नऊ आरोपी अटकेत

याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. दीपक पारेख (ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक), दिनेशभाई महासुखराय दवे, मनसुख बलजीभाई टोपिया (तिकीट क्लर्क), कंत्राटदार प्रकाशभाई लालजीभाई परमार, ठेकेदार देवांगभाई प्रकाशभाई परमार, सुरक्षारक्षक अल्पेशभाई, दिलीपभाई आणि मुकेशभाई यांना अटक करण्यात आली आहे. गांधीनगरपासून ३०० किमी अंतरावर मच्छू नदीवर बांधलेला हा मोरबी पूल ७ महिन्यांपासून बंद होता. पुलाच्या दुरुस्तीचे काम अजिंठा मॅन्युफॅक्चरिंग (ओरेवा ग्रुप) यांना मिळाले. ही कंपनी घड्याळे, एलईडी दिवे, सीएफएल बल्ब, ई-बाईक बनवते. मात्र, आता अजिंठा मॅन्युफॅक्चरिंगने दुरुस्तीचे कंत्राट अन्य काही कंपनीला दिल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -