घरदेश-विदेशमुंबई पोलिसांवर टीका करणारे Gupteshwar Pandey JDU च्या वाटेवर!

मुंबई पोलिसांवर टीका करणारे Gupteshwar Pandey JDU च्या वाटेवर!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी नुकताच व्हीआरएस घेऊन पोलीस नोकरीला रामराम केला होता. हे गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey) बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये उतरणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यावर आता शिक्कामोर्तब होत असून ते बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये (Bihar Assembly Election) संयुक्त जनता दल अर्थात JDU कडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची गुप्तेश्वर पांडे यांनी शनिवारी दुपारी १२च्या सुमारास भेट घेतली आहे. अर्थात, ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं पांडे यांनी सांगितलं असलं, तरी या भेटीचे राजकीय अर्थ मात्र स्पष्ट असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. गुप्तेश्वर पांडे यांना बक्सर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

निवृत्तीच्या काही महिने आधीच राजीनामा!

गुप्तेश्वर पांडे हे बिहारचे पोलीस महासंचालक होते. त्यांनी नुकतीच व्हीआरएस अर्थात स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. निवृत्तीच्या अगदी काही महिने आधी राजीनामा दिल्यामुळे यावर बरीच चर्चा रंगू लागली होती. मात्र, ज्या पद्धतीने गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून उघड उघड भाषणबाजी सुरू केली होती, ते पाहाता ते राजकीय मार्गावर असल्याचे अंदाज बांधले जात होते. अर्थात, याबद्दल अद्याप खुद्द गुप्तेश्वर पांडे यांच्याकडून जाहीर घोषणा झाली नसली, तरी त्यांची वाटचाल त्याच दिशेनं होत असल्याचं स्पष्ट असल्याचं जाणकार सांगतात.


हेही वाचा – गुप्तेश्वर पांडे एकटे नाहीत, काही तर ‘पुलिसगिरी’ सोडून थेट उपमुख्यमंत्री, राज्यपाल झालेत!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -