घरदेश-विदेश२६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदवर पाकिस्तानात बंदी

२६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदवर पाकिस्तानात बंदी

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशीची महत्वाची बैठक घेतली असून त्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदवर पाकिस्तानात बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.

मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हफिज सईदच्या जमाद-उद-दावा आणि त्याला मदत करणाऱ्या  फलाह-ए-इन्सानियत या संस्थेवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्शभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशीची महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोनही देशांच्या सीमेवर सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान, भारताकडून पुलवामा हल्ल्यानंतर कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला. पाकच्या या निर्णयानंतर हफिज सईद तुरुंगात जाणार का याकडे भारताचे लक्ष आहे.

जागतिक दबावामुळे निर्णय ?

जमात-उद-दावा ही लष्कर-ए-तोयबाची प्रमुख संघटना आहे. अमेरीकेने २०१४ साली जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या दोन्ही संघटनांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केले होते. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी पुलवामा हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांवर योग्यवेळी देऊ असे आश्वासन देत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील दबावामुळे आणि भारत सर्जिकल स्ट्राइक सारखी कारवाई करणार आशा भितीने पाकिस्ताननी हा निर्णय घेतला.

- Advertisement -

चोराच्या उलट्या बोंबा

एकीकडे काश्मीरच्या पुलवामा येथे झालेला हल्ल्यात पाकिस्तानचा कोणत्याही प्रकारे हात नाही असे सुरक्षा परिषदेने म्हटले आहे. तर दुसरीकडे जमात-उद-दावा या हाफिज सईदच्या संघटनेवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालत नाही अस दाखवायचा हा एक प्रयत्न. तर दुसरीकडे भारताने आक्रमण केल्यास प्रतिकार करण्यास सज्ज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्यामुळे या चोराच्या उलटया बोंबाच म्हणाव्या लागतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -