घरअर्थजगतमोठी बातमी! खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निम्म्या जागांवर लागणार सरकारी कॉलेजएवढी फी, केंद्राचा...

मोठी बातमी! खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निम्म्या जागांवर लागणार सरकारी कॉलेजएवढी फी, केंद्राचा मोठा निर्णय

Subscribe

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील निम्म्या जागांवर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणेच शुल्क आकारले जाईल, असा निर्णय आम्ही घेतला आहे. जनऔषधी दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली.

नवी दिल्लीः केंद्र सरकारने मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय. आता खासगी मेडिकल कॉलेजमध्ये 50 टक्के जागांवर सरकारी कॉलेजएवढीच फी आकारली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची घोषणा केलीय. सरकारच्या या निर्णयानंतर मेडिकलच्या लाखो विद्यार्थी आणि पालकांना एक मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी ट्विट करत हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलंय, ज्याचा मोठा फायदा गरीब आणि मध्यमवर्गीय मुलांना होणार आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील निम्म्या जागांवर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांप्रमाणेच शुल्क आकारले जाईल, असा निर्णय आम्ही घेतला आहे. जनऔषधी दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून वैद्यकीय शुल्कावरून गदारोळ सुरू होता. वैद्यकीय महाविद्यालयाची फी कमी करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत होती. याबाबत सरकार काही मोठे पाऊल उचलण्याची शक्यता होती. पीएम मोदी म्हणाले की, भारत सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आरोग्य क्षेत्राला बळकट करण्यासाठी पावले उचलत आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत संपूर्ण देशात एकच एम्स होते, मात्र सरकारच्या मजबूत इराद्यांमुळे आज 22 एम्स आहेत. आपल्या भाषणात पीएम मोदींनी जनऔषधी केंद्राचे जोरदार कौतुकही केले.

- Advertisement -

ते म्हणाले की, जनऔषधी केंद्रे आपल्या शरीराला नवसंजीवनी देतात आणि त्यांच्याकडे अशी औषधे देखील आहेत, ज्यामुळे आपल्या मनाची चिंता देखील मिटते. पूर्वी जेव्हा लोकांच्या हातात औषधाचे प्रिस्क्रिप्शन यायचे तेव्हा किती पैसे खर्च होतील, अशी भीती मनात असायची, पण आज ती चिंताही पूर्णपणे नाहीशी झालीय, असंही ते म्हणालेत.


हेही वाचाः Sanjay Raut : संजय राऊत मंगळवारी पत्रकार परिषद घेणार, कोणावर डागणार टीकेची तोफ?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -