घरताज्या घडामोडीMaharashtra Budget Session 2022 Live Update: अजित पवार आणि अशोक चव्हाण राजभवनावर...

Maharashtra Budget Session 2022 Live Update: अजित पवार आणि अशोक चव्हाण राजभवनावर दाखल

Subscribe

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसंदर्भात राज्यपालांसोबत चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि अशोक चव्हाण राजभवनावर दाखल झाले आहेत.


विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीचे मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण राज्यपालांची भेट घेणार आहेत.

- Advertisement -

विधान परिषदेचे कामकाज ५.२० वाजता तहकूब करण्यात आले आहे. शेतकर्‍यांची वीज कापू नका या मुद्द्यावर विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आज कामकाज तहकूब करण्यात आले.


विधान परिषदेचे कामकाज सुरू

- Advertisement -

विधानपरिषदेचे कामकाज 3.30 वाजेपर्यंत स्थगित


राज्यपालांच्या अभिभाषणावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबोधन रद्द


विधानसभेचे कामकाज स्थगित झाले असून उद्या ११ वाजता पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू होईल


होश मै आयो, होश मै आयो, मुख्यमंत्री होश मै आयो, अशी विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात,विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आजच्या लक्षवेधी पुढे ढकल्यात आली आहे.


ओबीसी आरक्षणाचे विधेयक विधानसभा सभागृहात मंजूर


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणावर संबोधन करणार

मुख्यमंत्री सभागृहाला संबोधित करणार


विधानसभा सभागृहाचे कामकाज २.३० पर्यंत स्थगित


विधानसभा सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित

शेतकऱ्यांच्या आणि वीज तोडणीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी


विधान परिषद सभागृहाच्या कामकाजास सुरुवात


कृषी पंपाची वीज तोडणी तात्काळ थांबवा, फडणवीसांची मागणी


रवी राणा यांच्यावरील कारवाईवरुन विधानसभेत गोंधळ

पुतळा उभारण्याची परवानगी न घेतल्यामुळे कारवाई केली – गृहमंत्री


विधान परिषद सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित

पुणे एसपी अभिनव देशमुख यांच्या निलंबनाच्या मागणीवर विधान परिषदेत विरोधकांची घोषणाबाजी, कामकाज १० मिनिटासाठी तहकूब


विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात


राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधानसभेत चर्चा


विधान परिषद सभागृहाचे कामकाज १२ वाजता सुरु होणार


मे २०२३ अखेरीस मुंबई गोवा महामार्गाची कामे पूर्ण करण्यात येणार – अशोक चव्हाण

मंत्री अशोक चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती


Maharashtra Budget Session 2022 : अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आमदारांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन


भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विधान परिषदेत घोषणा
रायगड जेेसडब्ल्यू प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेच्या निमित्ताने घोषणा
विधान परिषदेत आमदार जयंत पाटील यांनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर

प्रकल्पांसाठी भूसंपादनाचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर भूसंपादनात जमीनीचे दर वाढल्यास फेरफार करून नवीन मालक आल्यास ५० टक्के मोबदला हा मूळ मालकाला मिळणार. कायद्यात सुधारणा करून हे बदल करण्याची सुभाष देसाई यांची घोषणा


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची महत्त्वाची बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जयंत पाटील, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित

थोड्याच वेळात होणार बैठकीला सुरुवात


ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न,

उपमुख्यमंत्री अजित पवार ओबीसी आरक्षणावरील विधेयक विधान सभेत मांडणार


Maharashtra Budget Session 2022 : महाराष्ट्र अर्थसंकल्प अधिवेशनात आज ओबीसी आरक्षणावरुन गदारोळ होण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -