घरताज्या घडामोडी'हिंदू असून हिंदुत्ववादी नसेल तर तो खोटा हिंदू', अनिल विज यांचा राहुल...

‘हिंदू असून हिंदुत्ववादी नसेल तर तो खोटा हिंदू’, अनिल विज यांचा राहुल गांधींवर निशाणा

Subscribe

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदूत्ववादी यावर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. हिंदू असून जो हिंदुत्ववादी नसेल तर तो खोटा हिंदू असल्याची टीका हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी राहुल गांधींवर केली आहे. भारत देश हिंदूंचा आहे तसेच हिंदुत्ववाद्यांचा हा देश नाही असे राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी ट्विट करत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी सभेदरम्यान वक्तव्य केल्यानंतर अनिल विज यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये विज यांनी म्हटलं आहे की, जे हिंदू असून हिंदुत्ववादी नसतील तर ते खोटे हिंदू आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी जयपुर दौऱ्यावर होते. दौऱ्यात एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी हिंदू आणि हिंदुत्व या दोन शब्दांचे वेगवळे अर्थ सांगताना म्हणाले की, जसे दोन जिवंत प्राण्यांमध्ये एक आत्मा असू शकत नाही तसेच दोन शब्दांचा अर्थ एक असू शकत नाही.

- Advertisement -

महागाईविरोधात काढलेल्या मोर्चामध्ये राहुल गांधी म्हणाले, हा हिंदूंचा देश आहे. हिंदुत्ववाद्यांचा नाही. जर या देशात महागाई आणि त्रास असेल तर तो हिंदुत्ववाद्यांमुळे निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. २०१४ पासून हिंदुत्ववादी असलेल्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. याच हिंदुत्ववादी असणाऱ्यांना सत्तेतून घालवून हिंदूंची सत्ता आणायची आहे. असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, हिंदू आणि हिंदुत्ववादी हे दोन वेगळे शब्द आहेत. महात्मा गांधी हिंदू होते तर गोडसे हिंदुत्ववादी होते. काहीही झाले तरी हिंदू सत्य शोधतो. हिंदूंचा मार्ग सत्याग्रह असून पुर्ण आयुष्य तो सत्य शोधण्यामध्येच घालवतो असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही, हिंदुत्ववादी सत्तेसाठी भुकेले, राहुल गांधींचा घणाघात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -