घरदेश-विदेशबस चालवताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक; चालकाचा मृत्यू, प्रवासी सुखरुप

बस चालवताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक; चालकाचा मृत्यू, प्रवासी सुखरुप

Subscribe

बस चालवत असताना अचानक बस चालकाला हृदयविकाराचा धक्का आला. त्यामुळे त्याच्या छातीत दुखू लागले. मात्र, इतक्या त्रासातही त्याने गाडी चालवली. अखेर वेदना असह्य झाल्याने त्याने सुरक्षित स्थळी बस नेली आणि जीव सोडला. उत्तर प्रदेशच्या बांदा येथे ही घटना घडली आहे. ही बस बांदा येथून लखनऊला जात होती. बसमध्ये जवळपास ४० पेक्षा जास्त प्रवासी होते. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे या सर्व प्रवाशांचा जीव वाचला मात्र बस चालकाला आपला जीवा गमवावा लागला. विशेष म्हणजे चालकाने बस आरोग्यकेंद्रपर्यंत पोहोचवली. त्यानंतर उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.

बस चालकाच्या कुटुंबियांना मदत मिळणार

हृदयविकाराच्या धक्क्याने जीव गमावलेल्या बस चालकाचे नाव राजाबाबू आहे. ते ४० वर्षांचे होते. ते नरी गावात राहत होते. रोडवेज कराराअंतर्गत २०१४ साली ते कामावर रुजू झाले होते. सोमवारी सकाळी साडे पाच वाजता लखनऊ येथून बस निघाली होती. ही बस राजाबाबू चालवत होते. मात्र, त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले. वेदना असह्य झाल्याने त्याने आरोग्य केंद्राजवळ बस नेली. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चालकाची आरोग्य तपासणी झाली नव्हती का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. राजाबाबू यांच्या पश्चात त्यांना एक पत्नी आणि चार मुले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळेल, असे रोडवेजचे सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक परमानंद यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -