घरCORONA UPDATEचिंतेत वाढ! राजधानी दिल्लीत एका दिवसात कोरोनाच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद

चिंतेत वाढ! राजधानी दिल्लीत एका दिवसात कोरोनाच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद

Subscribe

दिल्ली शहरात आतापर्यंत १ लाख ७५ हजार ४०० लोकं कोरोनामुक्त

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग खूप वेगात पसरत आहे. गुरुवारी, दिल्लीत कोरोनाचे ४ हजार ३०८ नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांच्या संख्येने दिल्ली शहरात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाचे रुग्ण वाढून २ लाख ५ हजार ४८२ झाले आहेत.

दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत गेल्या २४ तासांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ हजार ६३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिल्ली शहरात आतापर्यंत १ लाख ७५ हजार ४०० लोकं कोरोनामुक्त झाले आहेत, तर मृतांची संख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली असून सध्या दिल्लीत सध्या २५ हजार ४१६ active रुग्ण आहेत.

- Advertisement -

देशातील बाधितांची संख्या ४४ लाख पार

काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांची संख्येते देखील विक्रम वाढ होत आहे. देशात कोरोना विषाणू प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून मागील २४ तासांत सर्वाधिक ९५ हजार ७३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार १७२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख ६५ हजार ८६४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७५ हजार ६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३४ लाख ७१ हजार ७८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ९ लाख १९ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

भारत जगात बाधितांच्या यादीत दुसऱ्या स्थानी

जगातील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८० लाखांहून अधिक असून ९ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचा कहर अमेरिका, भारत, ब्राझील, रशिया या देशांमध्ये आहेत. सध्या भारत जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत ब्राझील मागे टाकून दुसऱ्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -