भारतात बुर्ख्याला बंदी घालावी; हिंदू सेनेची गृह मंत्रालयाकडे मागणी

भारतात बुर्ख्याला बंदी घालण्यात यावी अशी मागणी हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता केली असून त्यांनी भारताचे गृह सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवले आहे.

ban burqa and niqab in india
भारतात बुर्ख्याला बंदी घालावी

देशातील दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी श्रीलंकेने बुर्ख्यावर बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ आता भारतातल्या हिंदू सेनेने देखील बुर्ख्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात हिंदू सेनेने गृह मंत्रालयाला पत्र लिहून मागणी केली आहे. हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी भारताचे गृह सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी या पत्रात असे म्हटले आहे की, दहशतवादी बुर्ख्याचा वापर करुन घुसखोरी करत हल्ले घडवून आणू शकतात. तसंच बुरखा घातल्यामुळे त्यांचे चेहरे सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ शकत नाही.

हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ‘ ‘आत्मघाती हल्लेखोर आणि दहशतवाद्यांना संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी दहशतवाद धोरण स्वीकारले गेले पाहिजे. त्याचसोबत या धोरणाला सर्व दहशतवादी विरोधी सैन्य आणि युनिट्स भारताच्या सार्वभौम भागाकडे लागू केले पाहिजेत.’ दरम्यान, श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेला केलेल्या साकखी बॉम्बस्फोटामध्ये ३५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यामध्ये ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. तर या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत १०० संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

२२ जानेवारी रोजी हिंदू सेनेने राणी व्हिक्टोरियाच्या ११८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजली वाहिली होती. त्यांचे असे म्हणणे आहे की, राणी व्हिक्टोरियाने मुगलांच्या जाचातून भाराताची मुक्तता केली होती. तसंच, हिंदू सेनेने ही देखील मागणी केली आहे की, सार्वजनिक ठिकाण, सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये कोणीही बुर्खा घालून येऊ नये. २०१७ मध्ये हिंदू सेनेने ७ किलोचा केक कापून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्मदिवस साजरा केला होता.