पाकिस्तान: हिंदू महिलेचे अपहरण; भाजप नेत्याने केला व्हिडिओ शेअर

'Hindu woman abducted in daylight in Pakistan's Sindh', says BJP leader Manjinder Singh Sirsa, shares disturbing video
पाकिस्तान: हिंदू महिलेचे अपहरण; भाजप नेत्याने केला व्हिडिओ शेअर

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत. आता पाकिस्तानच्या सिंधमधील एका हिंदू तरुणीचे भरदिवसा अपहरण केल्याचे समोर आले आहे. भाजपचे नेते मनजिंद सिंह सिरसा यांनी या घटनेसंदर्भातील व्हिडिओ शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे.

भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, सेशन कोर्टाच्या बाहेर एका हिंदू मुलीचे कसे अपहरण केले जात आहे, हे पाहू शकता. ही घटना पाकिस्तानच्या सिंध उमरकोटमध्ये घडली आहे. ती मदतीसाठी ओरडत होती, परंतु कोणी तिची मदत करत नव्हते. तिला केसाला पकडून फरपटत घेऊन कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले जात आहे.

दरम्यान पाकिस्तानमध्ये हिंदू धर्मासंबंधित घटना घडताना दिसत आहेत. कालच, मंगळवारी पाकिस्तानच्या कराचीत कट्टरपंथीयांनी नरियन पोरा हिंदू मंदिरावर हल्ला केल्याचे समोर आले. यावेळी दुर्गा मूर्तीची कट्टरपंथीयांनी विटंबना केली. याबाबतची माहिती पाकिस्तानी पत्रकार वीनगास यांनी ट्वीट करून दिली. पाकिस्तानमध्ये गेल्या २२ महिन्यातील हा हिंदू मंदिरावरील ९ मोठा हल्ला आहे. काही वर्षांपासून पाकिस्तानमधील कंट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हिंदू मंदिरांवरील हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये गणेश मंदिरावर कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पंजाब राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महानिरीक्षकांना तात्काळ बोलावण्यात आले होते.


हेही वाचा – चीन सर्वाधिक कर्जबाजारी देश, पाकिस्तानची अवस्था बिकट, भारतापेक्षा बांग्लादेशची अर्थव्यवस्था उत्तम