शेतकरी हिंसाचार प्रकरणी अमित शाह यांनी घेतला मोठा निर्णय

दिल्ली हिंसाचार प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झाली मोठी बैठक

home minister amit shah big decision about farmer violence
शेतकरी हिंसाचार प्रकरणी अमित शाह यांनी घेतला मोठा निर्णय

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या शेतकरी हिंसाचार लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत पॅरामिलिट्री फोर्सेसच्या १५ कंपनी तैनात करण्यात येणार आहे. सध्याची दिल्लीतील परिस्थितीत सांभाळण्याकरता पॅरामिलिट्री फोर्सेसच्या या कंपन्या दिल्ली पोलिसांना मदत करतील. केंद्रीय गृह मंत्रालयाची सातत्याने शेतकऱ्यांच्या हिंसाचारावर नजर आहे. गृह मंत्रालयाने अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक झाली आहे.

या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिल्लीत हिंसाचाराबाबतचे सर्व अपडेट अमित शाह यांना दिली. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिल्लीतील सर्व परिस्थितीबाबतची माहिती अमित शाह यांना दिली. गृहमंत्री अमित शाह या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दिल्ली-एनसीआरमधील काही भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे. गृह मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सिंघ, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई आणि त्याच्या जवळपास क्षेत्रातील काल रात्रीपासून ११.५९ PM पासून इंटरनेट सेवा अस्थायी स्वरुपात बंद केली. तसेच दिल्लीतील मेट्रोच्या काही स्टेशन प्रवेश बंदी केली. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करून हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – Deep Sidhu in Farmers Protest : आंदोलन भडकावण्याचा आरोप असणारा दीप सिधू नक्की कोण?