Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Video: वऱ्हाडात घुसली killer कार, लग्नाच्या वरातीची झाली अंत्ययात्रा!

Video: वऱ्हाडात घुसली killer कार, लग्नाच्या वरातीची झाली अंत्ययात्रा!

Related Story

- Advertisement -

एका वरातीत एका कारने वऱ्हाड्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये मंगळवार रात्री ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १२ जणांहून अधिक जण जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील नई मंडी ठाणे क्षेत्रात घडली आहे. या घटनेच्या वेळी नवविवाहित तरुणी कारच्या सनरूफवर डान्स करत होती. त्याचवेळेस बाजूने जाणाऱ्या एका भरधाव कारने वऱ्हाड्यांना अक्षरशः उडवलं आहे. या घटनेनंतर लग्न सोहळ्यात एकच गोंधळ माजला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच सध्या पोलीस याप्रकरणी तपासणी करत आहेत.

- Advertisement -

माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेनंनतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून कार सोडून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नवी मंडी स्थित असलेल्या खासगी रुग्णालयात जखमींना दाखल केले आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रमोद असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – धक्कादायक! मुलीचे दुःख विसरण्यासाठी ‘त्याने’ केलं परक्या मुलीचे अपहरण


- Advertisement -

 

- Advertisement -