घरदेश-विदेशसावधान! तुमचं ATM कार्ड असं होतं हॅक

सावधान! तुमचं ATM कार्ड असं होतं हॅक

Subscribe

डिजीटल व्यवहार जितके सोपे होत आहेत, तितकेच त्याच्या सुरक्षेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्लास्टिक मनी म्हणून एटीएम कार्ड प्रसिद्ध झाले. पैसे काढण्यासाठी बँकेच्या लांब रांगेत उभे राहण्यापेक्षा एटीएममधून पैसे काढणे कधीही फायदेशीर असल्यामुळे आजकाल प्रत्येकाकडेच एटीएम कार्ड असते. पण तुम्ही वापरत असलेले कार्ड सुरक्षित आहे का? एका देशातून हॅक केलेले कार्ड दुसऱ्या देशातही वापरले जाते. हे कसं होतं ? याबद्दल तुम्हालाही प्रश्न पडला असेल. एटीएम कार्ड हॅक कसे होते किंवा कार्ड क्लोनिंग म्हणजे काय ? याबद्दल जाणून घेऊया.

कार्ड क्लोनिंग हा शब्द हल्लीच्या काळात जास्त ऐकायला मिळतो. कार्ड क्लोन म्हणजे बनावट कार्ड बनवून पैसे चोरणे. दिवसेंदिवस या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे कार्ड क्लोन विषयी सामाजात जागरुकता होणे फार गरजेचे आहे.

- Advertisement -

अशा प्रकारे कार्ड क्लोनिंग केले जाते.

  • प्रत्येक डेबिट कार्डमध्ये मॅग्नेटिक स्ट्रिप असते. या स्ट्रिपमध्ये अकाऊंटशी संबंधित सर्व माहिती जतन केलेली असते.
  • कार्ड क्लोनिंगसाठी एटीएम केंद्रात स्कीमर नावाचे डिव्हाइस बसवले जाते. कार्ड स्वाइप करण्याच्या ठिकाणी हे स्कीमर बसवलेले असते. कुठलेही डेबिट कार्ड या मशीनवर स्वाइप केले की ते स्कीमर कार्डमधील सर्व माहिती कॉपी करुन घेते. यामध्ये अकाऊंट संबंधित संपूर्ण माहिती असते. कॉपी केलेला डेटा एका इंटरनल मेमरी यूनिटमध्ये स्टोर होतो.
  • यानंतर मिळालेला संपूर्ण डेटा एका ब्लॅंक कार्डमध्ये टाकला जातो. मग त्यानंतर खोटे व्यवहार करुन पैसे चोरले जातात.
  • बऱ्याचवेळा काही डिव्हाइसेस पिन-होल कॅमेऱ्यामध्ये असतात. ते कॅमेऱ्यातून पीन नंबर कैद करतात. त्यानंतर एका कार्डमध्ये ती माहिती भरुन पैसे काढून घेतात. महत्वाचे म्हणजे या गैरप्रकाराचा मुख्य आत्मा असणारे स्कीमर हे बाजारात फक्त सात हजारामध्ये उपलब्ध आहे. शिवाय, कित्येक ई-कॉमर्स वेबसाइटवर सुद्धा स्कीमर विकत घेतला जाऊ शकतो.

या गोष्टीं विषयी सावधानता बाळगा

१. ATM मशीन मधून रक्कम काढण्यापूर्वी आजूबाजूला कॅमेरा तर नाहीना, याची दक्षता घ्यावी.
२. कार्ड स्वाइप करते वेळी मशीनच्या वेग-वेगळ्या भागाला हात लावून बघा. कुठलीही वस्तू जर जाणवली तर सावधान व्हा. स्कीमर अशाच ठिकाणी बसविलेले असते, जे त्या स्वाइप मशीनचा भाग असल्याचा भास होतो.
३ स्वाइप केल्यानंतर तुम्हाला जर संशय आला, तर लगेच डेबिट कार्डचा पीन बदलावे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -