घरताज्या घडामोडीLockdown : एसी, पंखे, Work form home जोरात ? वीज बचतीच्या सोप्या...

Lockdown : एसी, पंखे, Work form home जोरात ? वीज बचतीच्या सोप्या टीप्स

Subscribe

कोरोनाच्या महामारीचे संकट आणि लॉकडाऊनचे कडक निर्बंध या कालावधीत घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रत्येक शहरातील स्थानिय यंत्रणेपासून राज्य सरकारमार्फत होत आहे. त्यामध्येच अनेकांना लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम करण्यासाठीच्या सूचना आहे. शाळांना सुट्टी असली तरी बच्चे कंपनीपासून घरातील जेष्ठ मंडळींचा मोबाईल, टेलिव्हिजनच्या माध्यमातून सर्रास इंटरनेटचा वापर एकीकडे सुरू आहे. तर दुसरीकडे उकाड्याने कहर केला आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला असतानाच घरातील पंखे, कुलर आणि एसीचा वापरही वाढलेला आहे. त्यामुळेच घरातील वीज वापरामुळे विजेच्या बिलाचा आकडा फुगण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच एसी, फ्रिज, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, पंखा, ट्यूब लाईट्सच्या माध्यमातून वीज बचतीच्या सोप्या टीप्स अवलंबून तुम्ही विजेची बचत नक्कीच करू शकता.

कोणत्या घरगुती वीज उपकरणासाठी काय आहेत टिप्स?

एअर कंडिशनर

– तापमान खूप कमी अंशांवर सेट करू नका. २४ ते २५ अंश सेल्सिअस हे मानवी शरिरासाठी पुरेसे असते

- Advertisement -

– एसी लावलेला असताना थंड हवेची गळती थांबविण्यासाठी खोलीचे दरवाजे, खिडक्या घट्ट बंद करा

– एसीचे तापमान १ अंशांने वाढवले तरी त्यातून ६ टक्के वीज बचत होते. वार्षिक १५०० रुपयांची बचत

- Advertisement -

– उन्हाळ्यात एसीचा वापर करण्याआधी तो स्वच्छ करा

– एसीसोबत पंखा लावल्यास थंड हवेचे अभिसरण अधिक जलद होते व त्यातून थंडपणामध्ये वाढ होते

 

फ्रिज

– फ्रिज व भिंत, यामध्ये किमान सहा इंचाची जागा ठेवा व रेफ्रिजरेशनसाठी हवेचे अभिसरण होऊ द्या. यामुळे फ्रिजची थंडपणाची क्षमता वाढते

– नवीन फ्रिज खरेदी करीत असल्यास ४ किंवा ५ तारांकित ऊर्जा बचतीचे फ्रिज घ्या. यामुळे जुन्या फ्रिजच्या तुलनेत ५० टक्के कमी वीज वापर होतो

– गरम अन्न बाहेरच थंड होऊ द्या व नंतर फ्रिजमध्ये ठेवा

 

वॉशिंग मशीन

– गरम पाण्याच्या सेंटिगऐवजी थंड पाण्याच्या सेटिंगनेच कपडे धुवा. यामुळे पाणी गरम करण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या ९० टक्के विजेची बचत होते

– कपडे वॉशिंग मशीनच्या ड्रायरने सुकविण्याऐवजी उन्हात किंवा नैसर्गिक हवेत वाळू द्या. यामुळे ड्रायरसाठी लागणाऱ्या विजेची बचत होते

 

लॅपटॉप/डेस्कटॉप – वर्क फ्रॉम होम

– अनेक ग्राहक सध्या घरुनच काम करीत आहेत त्यासाठी – लॅपटॉप/डेस्कटॉप वापरात नसताना पॉवर ऑफ करा. त्यातून ४० टक्के वीज वाचते

– लॅपटॉप हा फक्त ९० वॉट वीज वापर करतो. त्यामुळे तो वापरण्याला प्राधान्य द्या. तसेच जागाही कमी घेतो.

 

पंखा

– ऊर्जा बचतीचे पंचतारांकीत सीलिंग फॅन वापरा. त्यातून ६० टक्के कमी ऊर्जा खर्च होते.

– पंख्याचे रेग्युलेटर पारंपरिक (रेसिस्टीव्ह/मेकॅनिकल) ऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे वापरा

 

ट्यूबलाइट्स

– ३६ किंवा ४० वॉटचे टी८/टी१२ किंवा २८ वॉटचे टी५ ट्यूबलाइट्स २० वॉटच्या एलईडी दिव्यांनी बदला. त्याद्वारे कमी वीज वापरात तेवढाच अथवा अधिक प्रकाश मिळतो

– चमकणारे किंवा सीएफएल दिवे एलईडी दिव्यांनी बदला. त्यामुळे ५० टक्के विजेची बचत होते व त्याचे वयोमान सहा ते दहापट अधिक असते.

एनर्जी एफिशिअन्ट पंखे कसे मागवाल ?

लॉकडाऊनदरम्यान ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने अनेकांकडून विजेचा अतिरिक्त वापर होत आहे. हि घरगुती ग्राहकांसाठी खास ऑफर आहे. ग्राहकांसाठी नवीन सुपर एफिशीएंट पंचतारांकित सिलिंग पंखे ६०% सवलतीच्या दरात असून हे ६०% कमी वीज खर्च करतात. १९१२२ वर कॉल करून एईएमएलचे ग्राहक जास्तीत जास्त तीन पंखे आपल्या ग्राहक खात्यावर मागवू शकतात. अधिक माहितीसाठी एईएमएलच्या https://www.adanielectricity.com/MoneySaver या संकेतस्थळाला भेट देता येईल.

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -