घरदेश-विदेशICICI बँकेसह 'या' बँकांची नवी सेवा सुरू! आता फक्त मोबाइल नंबरवरून पाठवता...

ICICI बँकेसह ‘या’ बँकांची नवी सेवा सुरू! आता फक्त मोबाइल नंबरवरून पाठवता येणार १ लाख रुपये!

Subscribe

कोरोना महामारीदरम्यान, कोरोना संक्रमण टाळण्यासाठी लोकांनी रोख व्यवहार मोठ्या प्रमाणात टाळले. तर लोकांनी डिजिटल व्यवहारांना अधिक प्राधान्य दिले. कोरोना दरम्यान डिजिटल व्यवहार जरी होत असले तरी एकाच वेळी एकत्र मोठी रक्कम पाठवताना यामध्ये समस्या निर्माण झाल्याचे बँक ग्राहकांनी सांगितले. पैसे पाठवण्यासाठी कित्येक डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सच्या मदतनीने युजर्सना एका दिवसामध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रोख रक्कम पाठवण्याची परवानगी दिली जाते. जर तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला असेल, तर आता तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही फक्त मोबाइल नंबरद्वारे तुमच्या मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना १ लाख रुपयांपर्यंत पाठवू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँकेने पे टू कॉन्टॅक्ट किंवा पे कॉन्टॅक्ट सर्व्हिस सेवा सुरू केली आहे. या नवीन सेवेच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरद्वारे मित्राला किंवा कोणत्याही नातेवाईकाला त्यांच्या मोबाइल नंबरवर पैसे पाठवू शकतात. आतापर्यंत, यूपीआयमार्फत पैसे पाठविण्यासाठी, इतरांच्या बँक खात्याचा तपशील किंवा यूपीआय आयडी आवश्यक होते. एकदा ही सेवा सुरू झाल्यानंतर यापुढे कशाचीच आवश्यकता भासणार नसल्याचे सांगितले जात आहे.

असे पाठवता येणार पैसे

  • सर्व प्रथम तुमच्या बँकेचे अ‍ॅप उघडा. त्यानंतर पे टू कॉन्टॅक्टवर क्लिक करा किंवा Pay Your Contact वर क्लिक करा
  • मोबाइलमधील फोन बुक उघडा. त्यानंतर तुम्हाला कोणाला पैसे पाठवायचे ते निवडा.
  • असे केल्याने बँकेच्या अ‍ॅपला संपर्काचा यूपीआय पत्ता आपोआप मिळेल. यासाठी सेंडरचा यूपीआय पत्ता देखील असणं आवश्यक आहे
  • आता रक्कम आणि पासवर्ड टाका. यानंतर हे पैसे दुसर्‍याच्या खात्यात जमा होतील
  • बँकांच्या मते, यूपीआयच्या नव्या सेवेसह पेमेंट करताना यूपीआय आयडी किंवा बँकेचा तपशील आवश्यक नाही.
  • नवीन सेवेच्या माध्यमातून कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम पाठविण्यास परवानगी देणार आहे.
  • आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक दररोज १ लाख रुपयांपर्यंत रक्कम पाठवू शकतात

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -