Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र SSC Result 2021: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SSC Result 2021: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Related Story

- Advertisement -

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती. अखेर निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. अंतर्गत मूल्मापनाच्या आधारे निकाल दिला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यासंदर्भातील माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागेल अशी माहिती दिली होती. राज्य सरकारने निकालासाठी दिलेली डेडलाईन आज संपत आहे. त्यामुळे दहावाचा निकाल लांबणीवर पडणार असल्याची शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु, दहावीचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे.

- Advertisement -

१६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसले होते. यामधअये ९ लाख ९ हजार ९३१ मुलं होती तर ७ लाख ४८ हजार ६९३ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ मे २०२१ च्या शासन निर्णयनुसार परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर २८ मे २०२१ शासन निर्णयानुसार दहावीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर झाली. त्यासाठी २० जून रोजी मूल्यमापन कार्यपद्धीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि वेबिनार घेण्यात आले. दरम्यान, २३ जून ते २ जुलै २०२१ पर्यंत माधअयमिक शाळांनी संगणक प्रणालीमध्ये गुण नोंदवले. त्यानंतर ३ जुलै पासून १५ जुलैपर्यंत मंडळातर्फे निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.

असा पाहा निकाल

- Advertisement -

दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
  • त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
  • निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
- Advertisement -