घरदेश-विदेशAl-Qadir Trust case : इम्रान खान यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली? वाचा...

Al-Qadir Trust case : इम्रान खान यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली? वाचा –

Subscribe

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (PTI) प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. दोन खटल्यांच्या सुनावणीसाठी ते इस्लामाबाद उच्च न्यायालयात आलेले असताना पाक रेंजर्सनी त्यांना अटक केली. अल कादिर ट्रस्ट प्रकरणात (Al-Qadir Trust case) त्यांना अटक करण्यात आली आहे. शासकीय तिजोरीवर डल्ला मारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वस्तुत:, इम्रान खान यांच्यावर एकूण शंभराहून अधिक खटले दाखल असून त्यापैकी किमान चार प्रकरणांत त्यांची अटक निश्चित असल्याचे सांगण्यात येते.

इम्रान खान यांची अटक अल कादिर ट्रस्ट विद्यापीठाशी संबंधित असून फसवणुकीबद्दल इम्रान खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी (Bushra Bibi) आणि त्यांचे जवळचे सहकारी झुल्फिकार बुखारी आणि बाबर अवान यांनी अल-कादिर प्रोजेक्ट ट्रस्टची स्थापना केली होती. पंजाबमधील झेलम जिल्ह्यातील सोहावा तहसीलमध्ये ‘दर्जेदार शिक्षण’ देण्यासाठी अल-कादिर विद्यापीठ स्थापन करण्याची योजना यामागे होती.

- Advertisement -

आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत इम्रान खान यांनी या विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिली होती. पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मलिक रियाझ यांनी हे प्रकरण उघड केले होते. अटकेचा धाक दाखवून इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीने कोट्यवधी रुपयांची जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप रियाझ यांनी केला होता.

त्यानंतर रियाझ आणि त्यांच्या मुलीच्या संभाषणाचा एक ऑडिओ लीक झाला होता. इम्रान यांची पत्नी बुशरा बीबी या आपल्याकडे सतत पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागत असल्याचे रियाझ यांच्या मुलीने या संवादादरम्यान सांगितले होते. यावर रियाझ म्हणतात की, तिने सर्वकाही केले तर तिला पाच कॅरेटची अंगठी देऊन टाक.

- Advertisement -

विशेष म्हणजे, अल कादिर विद्यापीठात केवळ दोन विश्वस्त आहेत, इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा. सुमारे 90 कोटींच्या या विद्यापीठात 6 वर्षांत केवळ 32 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. या सर्व प्रकरणात सरकारी तिजोरीला 190 मिलियन पौंडचा फटका बसल्याचे सांगण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -