Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नागपूर विद्यापीठात उभारणार शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा; ही आहेत वैशिष्ट्ये...

नागपूर विद्यापीठात उभारणार शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा; ही आहेत वैशिष्ट्ये…

Subscribe

नागपूर विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा राज्याभिषेकाची आठवण करून देणार असणार आहे.

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जगातील सर्वात मोठा पुतळा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ( Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) बसवणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर शताब्दी वर्षानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने विद्यापीठाच्या महाराज बाग येथे पुतळा बसवणार आहे. महाराजांची ही मूर्ती कांस्य धातूची असणार आहे, तर महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) कला विभाग आणि संचालयनायाने यासाठी मान्यता देखील दिली आहे.

नागपूर विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा राज्याभिषेकाची आठवण करून देणार असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा सर्वसामान्यांच्या मनात मानवतावादी दृष्टीकोन रुजवण्याची प्रेरणा देणार असल्याची माहिती पत्रकातून प्रसिद्ध केले आहे. नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू संजय दुधे, स्मारक समितीचे अध्यक्ष मुधोजी राजे भोसले, सचिव मंगेश ड्यूके, सहसचिव तथा संस्थापक प्रशांत कडू, कोषाध्यक्ष विजय शेंडे,उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, प्राचार्या प्रवीणा खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

 महाराजांचा पुतळा असा असणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा हा चाबुतराची लांबी २० फूट, उंची ९ फूट आणि रुंदी १५ फूट असणार आहे. महाराजांच्या सिंहासरूढ पुतळ्याची उंची ३२ फूट असेल. तसेच महाराजांच्या डोक्यावरील छत्री ७ फुटांची असणार आहे. महाराजांचा पुतळा कांस्य धातूपासून बनवलेली मूर्तीचे वजन १०,००० किलो एवढे असणार आहे. महाराजांचा पुतळा हा मूर्तीकार सोनल कोहाड हे तयार करणार आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -