घरदेश-विदेशpulvama attcked:दिल्लीतील बैठकीत सर्वपक्षीयनेत्याचा सरकारला पाठिंबा

pulvama attcked:दिल्लीतील बैठकीत सर्वपक्षीयनेत्याचा सरकारला पाठिंबा

Subscribe

दिल्लीच्या संसद भवनात पार पडलेल्या बैठकीत दहशदतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा सरकारला पाठिबा.

संपूर्ण देशभरात काश्मिरच्या पुलवामा येथे झालेल्या दहतवादी हल्ल्याविरोधात संतापाची लाट उसळलेली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या संसद भवनात पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सरकारला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. दरम्यान,  शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना या दहतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठीची रणनीती आणि सर्वाधिकार जवानांना दिले आहेत. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचंही यावेळी मोदी म्हणाले.

काय चर्चा झाली..?

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला आहे. जम्मू-काश्मीर मधून दहशतवाद संपवण्यासाठी सरकात कटिबद्ध आहे. त्याचबरोबर काश्मीरमधील जनतेला शांतता हवी असून ते आपल्या सोबत असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान सीमेपलीकडून दहशतवाद्यांना आश्रय मिळत असल्याचा निषेध करण्यात आला.

- Advertisement -

काय म्हणाले गुलाम नबी आझाद

बैठक संपल्यानंतर कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं असल्याचं देखील यावेळी सांगितलं. तसेच दहशतवाद संपवण्यासाठी संपूर्ण कॉंग्रेस पक्ष जवानांच्या सोबत संपूर्ण ताकदीनिशी उभा असल्याचं सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -