घरCORONA UPDATEगेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे दोन हजार नवे रुग्ण, नव्या व्हेरियंटचा धोका...

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे दोन हजार नवे रुग्ण, नव्या व्हेरियंटचा धोका कायम

Subscribe

नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात २११२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, सात रुग्णांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी २११९ नवे रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत आज सात रुग्णांनी संख्या घटली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका अद्यापही कायम असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येतंय.

हेही वाचा – मॅक्सिकोमध्ये ऑईल टँकरची धडक; ट्रेन पूर्णपणे जळून खाक

- Advertisement -

ओमिक्रॉन हा कोरोनाचा व्हेरियंट आहे. आता ओमिक्रॉनचेच तीन आणखी उपप्रकार आढळून आले आहेत. BF.7, XBB आणि BA.5.1.7 या तिन्ही उपजातीच्या विषाणूचे रुग्ण भारतात सापडले आहेत. हे तिन्ही विषाणू कोरोनाच्या विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य आहेत. त्यामुळे या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. मंगळवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोविड चाचण्यावर भर देण्यास सांगितलं आहे.


दरम्यान, गेल्या २४ तासांत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत ५ लाख २८ हजार ९५७ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. तर, सध्या देशात २४ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत देशात ३ हजार १०२ रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -