India corona update : देशात कोरोनाचे आज 2,075 नवे रुग्ण; 71 रुग्णांचा मृत्यू

चीन, थायलंड, दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. चीनमध्ये तर पुन्हा कडक लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र भारतात कोरोना महामारी आता नियंत्रणात येत आहे. गेल्या 24 तासात देसात कोरोनाचे 2,075 नवे रुग्ण आढळून आले. तर 71 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासोबत देशात काल 3,383 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. काल हीच कोरोना रुग्णसंख्या 2528 इतकी होती तर 149 मृतांची नोंद झाली होती. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्याबरोबरचं मृतांची संख्या देखील मोठ्याप्रमाणात घटली आहे. देशात सध्या 27,802 (0.06 टक्के) कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 98.73 टक्के झाला आहे. देशात आत्तापर्यंत 4 कोटी 24 लाख 61 हजार 926 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना डेली पॉझिटिव्हीटी रेट हा 0.56 टक्के आहे तर वीकली पॉझिटिव्हीटी रेट 0.41 टक्केच आहे.

देशात गेल्या 24 तासात 3 लाख 70 हजार 514 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत देशात 78. 22 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 181.04 कोटी डोस देण्यात आले आहेत.


‘औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे शिवसेनेचे आदर्श…’ MIM च्या युतीच्या ऑफरवर राऊतांची प्रतिक्रिया