घरताज्या घडामोडीLPG Cylinder : इंडिया पोस्टच्या माध्यमातून LPG सिलेंडर बुक करता येणार, IPPB...

LPG Cylinder : इंडिया पोस्टच्या माध्यमातून LPG सिलेंडर बुक करता येणार, IPPB च्या नव्या ॲपची सुविधा

Subscribe

ऑनलाईच्या जगात एलपीजी सिलिंडरची बुकिंग डिजीटलच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सोई-सुविधा मिळत आहेत. कारण आता एका क्लिकवर घरातील गॅस सिलिंडर बुक करता येतो. इंडेन, भारत आणि एचपी यांसारख्या सर्वच गॅस कंपन्यांनी ग्राहकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. त्याशिवाय ग्राहक इंडिया पोस्ट पेमेंन्टस बँकेच्या मोबाईल अॅपवरून घर बसल्या एलपीजी सिलिंडर बुक करू शकता. इंडिया पोस्ट पेमेन्ट बँकेने याबाबत ट्विट देखील केले आहे. यासंबंधीत ग्राहकांनी सुद्धा माहिती दिली आहे. ट्विटवर सांगण्यात आलंय की, आयपीपीबी ऑनलाईन आपल्या मोबाईल बँकेच्या अॅपमधून एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंग करा. कारण ही उत्तम, सरळ आणि सुरक्षित अशी सुविधा आहे.

आयपीपीबीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये सिलिंडरची बुकींग कशी करावी, याबाबत प्रोसेस सांगण्यात आली आहे. ऑनलाईन सिलिंडर बुक करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आयपीपीबी मोबाईल बँकेचं अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर लॉगिन केल्यावर एलपीजी सिलिंडरच्या ऑप्शनची निवड करावी लागेल. निवड केल्यानंतर एक मॅसेज मिळेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीटी येईल. ओटीटी टाकल्यानंतर तुमचा गॅस सिलिंडर बुकींग होईल. तसेच गॅस बुकींग झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस प्राप्त होईल. एसएमएस आल्यानंतर समजेल की, गॅस सिलिंडरची बुकींग झाली आहे.

- Advertisement -

देशातील चारही महानगरांमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर वेगवेगळे आहेत. राजधानी दिल्लीत एलपीज सिलिंडरची किंमत ८९९.५० रूपये इतकी आहे. तर मुंबईमध्ये सिलिंडरची किंमत ८९९.५० इतकी आहे. तर कोलकातामध्ये ९२६ रूपये आणि चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ९१५.५० रूपये इतकी आहे.

- Advertisement -

हेही वाचा: Winter Session 2021: एक डझन चोरी करणारे लोकं भाजपामध्ये जाऊन साधू बनले – खासदार विनायक राऊत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -