घरताज्या घडामोडीWinter Session 2021: चोरी करणारे एक डझन लोक भाजपमधून जाऊन साधू बनले...

Winter Session 2021: चोरी करणारे एक डझन लोक भाजपमधून जाऊन साधू बनले – खासदार विनायक राऊत

Subscribe

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप करण्यात आले. त्यांना सुप्रीम कोर्टाने फरार घोषीत केलं आहे. मात्र त्यांना अटक केली नाही. तर देशमुखांना अटक केली. मु्ंबईच्या आयुक्तांनी सांगितलं की, त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. असं कोर्टात त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, ज्या नेत्यांवर आरोप होते. ते नेते भाजपामध्ये जाऊन साधू बनायचे. परंतु आज सुद्धा एक दुर्भाग्या म्हणजे या केंद्रीय मंत्रिमंडळात जो कालचा आरोपी होता. ते आज साधू बनून बसले आहे. महाराष्ट्रातील एका विरोधी पक्षातील नेत्याने २२ हजार कोटींची विग चोरी केली होती. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन ते संध व साधू बनले. अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांवर केली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये खासदार विनायक राऊत म्हणाले की, मागील ६ महिन्यांपासून अनिल देशमुखांना ईडीच्या कोर्टात बसवलं आहे. परमबीर सिंह यांनी सांगितलं की आमच्याकडे काही लिखित नाही किंवा याबाबत काहीही माहिती नाहीये. जिथे गैरव्यवहार होतात किंवा भ्रष्टाचार केले जात आहेत. ज्या लोकांनी संपत्ती लुटली आहे. त्यांच्या विरोधात कारवाई होण्याची आवश्यकता आहे. तसेत त्यांच्यावर कारवाई केलीच पाहीजे.

- Advertisement -

ज्या नेत्यांवर आरोप होते. ते नेते भाजपामध्ये जाऊन साधू बनायचे. परंतु आज सुद्धा एक दुर्भाग्या म्हणजे या केंद्रीय मंत्रिमंडळात जो कालचा आरोपी होता. ते आज साधू बनून बसले आहे. महाराष्ट्रातील एका विरोधी पक्षातील नेत्याने २२ हजार कोटींची विग चोरी केली होती. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन ते संध व साधू बनले. कालचे चोर आज साधू बनले. २२ हजार कोटींची चोरी करणारे लोक आज साधून बनले आहेत. एक डझन चोरी करणारे आणि भ्रष्टाचार करणारी लोकं आज भाजापामध्ये जाऊन साधू बनले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये जे प्रामाणिक लोक आहेत. त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात येते.मात्र भाजपा पक्षाचा एक नेता बोलतो की, उद्या किंवा परवा तुमच्यावर ईडीचा छापा पडू शकतो. ते बोलल्यानंतर सहा महिन्यांसाठी त्यांना जामीन सुद्धा मिळत नाही. भाजपा पक्षाच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून ईडीचा कार्यकाळ सुरू आहे का, सीबीआय त्यांच्या माध्यमातून काम करतेय का? आठ तास मंत्र्यांची चौकशी केली जाते. कोरोनाच्या काळात या देशाला लुटणारे कितीतरी लोकं परदेशात गेली. एक डझन देशाला लुटणारे लोकं परदेशात पळून गेले.

- Advertisement -

झोनल डायरेक्टर यांचं मी नाव घेत नाही. त्यांनी आर्यन खान प्रकरणात क्रूझवरती रेड केली होती. जेव्हा आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची मागणी करण्यात आल्याचं त्या प्रकरणातील एका साक्षीदाराने म्हटलं आहे. आर्यन खानला सोडण्याची मागणी ही एनसीबीच्या झोनल डायेक्टरांनी केल्याचं सांगण्यात येत आहे. असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

राजकारण करणार लोक ज्याप्रमाणे या तिन्ही एजन्सीचा दुरूपयोग करत आहेत. असा दुरूपयोग स्वतंत्र भारताच्या पहिले कधीच झाला नव्हता. काही लोकं मुंबईमध्ये येऊन बसले आहेत. मुंबईमध्ये येऊन मजामस्ती करत आहेत. दिल्ली सुद्दा त्यांनी सोडून दिली असून दिल्लीतलं प्रदूषण चांगलं नसल्यामुळे त्यांनी आपला मार्ग मुंबईला बदलला. बिहारच्या निवडणुका होत्या तेव्हा सुशांत सिंह सारखा चांगला बॉलिवूड अभिनेत्याने काही कारणास्तव आत्महत्या केली होती. त्याच्या वडीलांनी मागणी केली असता राज्य सरकारने त्याच्या चौकशीचे आदेश जारी केले. त्यानंतर एसआयटीची निर्मिती करण्यात आली. मात्र, दिल्लीतील लोकांनी विचार केला की, महाराष्ट्रमध्ये असणाऱ्या एसआयटीकडून त्याची चौकशी केली जाणार नाही. त्यामुळे त्यांनी ही चौकशी तात्काळ दिल्लीतील सीबीआयला दिली. महाराष्ट्राची पोलीस अधिक सक्षम असून सुद्धा त्यांनी दिल्लीकडे चौकशी परवानगी दिली. त्यामुळे काय समोर आलं, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा: Farmer suspend agitation : तीन कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन ३७८ दिवसांनंतर संपुष्टात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -