Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी India Corona Update: देशात गेल्या २४ तासात नव्या बाधितांचा आकडा ४१ हजारांवर;...

India Corona Update: देशात गेल्या २४ तासात नव्या बाधितांचा आकडा ४१ हजारांवर; ५०७ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल बुधवारी गेल्या २४ तासात ४२ हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळले असून मृत्यूच्या संख्येत ३ हजाराने वाढ झाल्याचे समोर आले होते. मात्र आज देशात गेल्या २४ तासात कोरोना बाधितांसह मृतांचा आकडा देखील कमी झाल्याचे समोर आले आहे. गुरूवारी गेल्या २४ तासात ४१ हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून ५०७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज देशात ३८ हजार ६५२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ३८३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५०७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३८ हजार ६५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १२ लाख ५७ हजारांवर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख १८ हजार ९८७ जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी ४ लाख २९ हजार ३३९ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ९ हजार ३९४ जणांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

देशभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सूरू आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील लसीकरणाचा टप्पा ४१ कोटी पार केला असून आतापर्यंत ४१ कोटी ७८ लाख ५१ हजार १५१ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात २१ जुलैपर्यंत ४५ कोटी ०९ लाख ११ हजार ७१२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या. यापैकी काल दिवसभरात १७ लाख १८ हजार ४३९ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली.

- Advertisement -

- Advertisement -