घरCORONA UPDATEभारतात आढळणाऱ्या कोरोना व्हेरियंटचे WHO कडून नामकरण, 'डेल्टा' आणि 'कप्पा' नावाने ओळखले...

भारतात आढळणाऱ्या कोरोना व्हेरियंटचे WHO कडून नामकरण, ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ नावाने ओळखले जाणार हे व्हायरस

Subscribe

भारतीय व्हेरियंट नावावरून वाद 

देशासह जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढतोय. या वाढत्या प्रकरणात कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरियंट भारतासह अनेक देशात आढळत आहेत. परंतु कोरोना विषाणुच्या नव्या व्हेरियंटच्या नावाबाबत अनेक अडचणी सध्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक देशात आढळणाऱ्या नव्या व्हेरियंटला त्या देशाच्या नावाने ओळखले जात होते. परंतु या गोष्टीवर भारतासह चीनने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे आता WHO ने पुढाकार घेत प्रत्येक देशात आढळणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला विशिष्ट नाव दिले आहे. WHO ने ग्रीक अल्फाबेटच्या आधार घेत व्हेरियंटचे नामकरण केले आहे.

भारतासह इतर देशांत आढळणाऱ्या व्हेरियंटचेही WHO कडून नामकरण 

WHO च्या माहितीनुसार भारतात आढळणाऱ्या B.1.617.2 व्हेरियंटला आता डेल्टा (Delta) व्हेरियंट संबोधले जाणार आहे. तर B.1.617.1 या व्हेरियंटचे कप्पा (Kappa) असं नामकरण केले आहे. भारतासह इतर देशात आढळणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचेही WHO ने नामकरण केले आहे. यात ब्रिटनमध्ये २०२० मध्ये आढळलेल्या नव्या व्हेरियंटला अल्फा असे म्हटले आहे तर दक्षिण आफ्रिकेत आढळणाऱ्या व्हेरियंटला बीटा असे नाव दिले आहे. यांसह अमेरिकेत आढळणाऱ्या व्हेरियंटलाही WHO ने विशिष्ट्य नाव दिले आहे.

- Advertisement -

भारतीय व्हेरियंट नावावरून वाद 

मे महिन्याच्या सुरवातीस भारतात आढळणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट किंवा स्ट्रेन म्हणून ओळखले जात असल्याने वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारनेही यासंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर आक्षेप नोंदवला होता. ज्यात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या B.1.617.2 व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट असे नाव दिल्याचे स्पष्ट केले होते. परंतु यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत सांगितले की, WHO ने कधीही कोरोनाच्या व्हेरियंटचा उल्लेख भारतीय असा केला नाही. परंतु अनेक माध्यमांनी असे वृत्त दिले की, जागतिक आरोग्य संघटनेने B.1.617.2 व्हेरियंट जागतिक समुदायासाठी घातक आहे असे म्हटले ,मात्र WHO च्या नावाने कोरोना नव्या व्हेरियंटच्या नावांसंबंधीत पसरणाऱ्या बातम्या खोट्या आहेत.

केंद्र सरकारने घेतला आक्षेप 

कोरोनाचा भारतीय व्हेरियंट या शब्दावर केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर WHO ने यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. WHO ने ट्विटरवर प्रतिक्रिया देत म्हटले की, जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही व्हेरियंटला त्या देशाच्या नावावरून संबोधले जात नाही. WHO विषाणूच्या व्हेरियंटला त्याच्या शास्त्रीय नावानेच संबोधित करते आणि इतर देशांनाही असे करावे अशी आशा करते असेही WHO ने म्हटले.

- Advertisement -

रोज १ कोटी नागरिकांना लस देण्याची केंद्राची योजना


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -