घरदेश-विदेशभारतापुढे अमेरिकेची नरमाईची भूमिका

भारतापुढे अमेरिकेची नरमाईची भूमिका

Subscribe

इराणकडून तेल आयात केल्यास निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. पण, हे निर्बंध आता अमेरिकेनं उठवले आहेत.

इराणकडून भारत तेल खरेदी करू शकत नाही अशी ताठर भूमिका अमेरिका अर्थात ट्रम्प प्रशासनानं घेतली होती. मात्र आता इराणकडून तेल खरेदीबाबत अमेरिकेनं नरमाईची भूमिका घेतली आहे. इराणकडून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेने भारतासह अन्य सात देशांवर निर्बंध घातले होते. पाच नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होत असताना अमेरिकेनं मात्र भारतासह अन्य सात देशांना या निर्बंधातून मुभा दिली आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि भारतासह इतर देशांना आता इराणकडून तेल विकत घेता येणार आहे. इराण सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे इराणची आर्थिक कोंडी करणं हे ट्रम्प प्रशासनानं लक्ष्य होतं. मात्र, आता अमेरिकेनं निर्बंध उठवल्यानं भारतासह अन्य देशांना इराणकडून मुबलक प्रमाणात तेल खरेदी करता येणार आहे.

भारताला दिलेला इशारा

भारतानं इराणकडून तेल खरेदी केल्यास भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेनं भारताला दिला होता. शिवाय, रशिया आणि भारताचे सुधारणारे संबंध यामुळे देखील अमेरिका अस्वस्थ होती. त्यात भारतानं रशियाशी केलेला संरक्षण क्षेत्रातील करार यामुळे देखील अमेरिका दुखावली गेली होती. परिणामी, भारत आणि अमेरिकेतील संबंध देखील ताणले गेल्याची चर्चा होती. दरम्यान, ट्रम्प यांनी २६ जानेवारी रोजी भारतात येण्याचं आमंत्रण देखील फेटाळलं होतं. त्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणल्याची चर्चा होती. त्यामुळे अमेरिका भारतावर इराणकडून तेल आयात केल्यास निर्बंध लादेल अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. पण आता मात्र अमेरिकेनं भारतासह ७ देशांवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळं भारत आता इराणकडून तेल आयात करू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -