महागाईने मोडला १० वर्षांचा विक्रम; महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर

गेल्या अनेक दिवसांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. इंधन, जीवनाश्यक वस्तूंसह सर्वांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. इंधन, जीवनाश्यक वस्तूंसह सर्वांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. अशातच आता वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा आकडा मागील 10 वर्षांतील सर्वाधिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक 13.11 टक्क्यांवर होता. तर मार्चमध्ये हाच निर्देशांक 14.55 टक्क्यांवर पोहोचला होता. तसंच, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांक 10.74 टक्के इतका होता. मागील 13 महिन्यांपासून घाऊक महागाई दर दोन अंकी नोंदवण्यात आला आहे. शिवाय, खनिज तेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ आणि रसायनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एप्रिल महिन्यात महागाई दर वाढला असल्याचं सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एप्रिल महिन्यात खाद्यपदार्थांवरील महागाईचा दर 8.35 टक्के नोंदवण्यात आला आहे. हाच दर मार्च महिन्यात 8.06 टक्के इतका होता.

भाज्यांच्या किमतीतही वाढ झाल्याने खाद्यपदार्थांवरील महागाईचा दर वाढला असल्याचे अहवालात म्हटले आहे. एप्रिलमध्ये भाज्यांचा महागाई दर 23.24 टक्के नोंदवण्यात आला आहे. हा दर मार्च महिन्यात 19.88 टक्के होता.

पेट्रोल, डिझेल आणि उर्जा क्षेत्रातील महागाईच्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. 38.66 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा दर मार्चमध्ये 34.52 टक्के होता. दरम्यानच्या काळात एलपीजी गॅसच्या किमतीत देखील 38.48 टक्क्यांची वाढ झाली आहे.


हेही वाचा – मंत्र्यांच्या बंगल्यांत 15 मिनिटांचा ब्लॅक आऊट