घरदेश-विदेशVideo: बालाकोटमधील एअर स्ट्राइकचा व्हिडिओ जारी

Video: बालाकोटमधील एअर स्ट्राइकचा व्हिडिओ जारी

Subscribe

पाकिस्तानला केलेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला. आज या एअर स्ट्राईक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भारतीय हवाई दलानं २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हवाईदल दिनानिमित्ताने दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत हा व्हिडिओ जारी करण्यात आला. हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. या व्हिडिओमध्ये भारताची लढाऊ विमाने आकाशात झेपवण्यापासून ते निशाणा साधण्यापर्यंतचे क्षण दाखविण्यात आले आहेत.

१४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. याच हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने १२ दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारीला पाकिस्ताना बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केले. हे एअर स्ट्राइक करून जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली होती. या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी असलेल्या पाच वैमानिकांचा हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आला होता.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये पुलावामा हल्ल्याचा बदला घेतल्याची माहिती व्हॉईस ओव्हरमधून देण्यात आली आहे. पुलावामा हल्ल्यानंतर निर्माण झालेला भारतीयांचा आक्रोश, तसंच याचा बदला घेण्यासाठी आखलेल्या हल्ल्याची योजना, त्यानंतर हवाई दलाने कशाप्रकारे बालाकोटवर हल्ला केला अशा सर्व प्रकारच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हद्दीत घुसखोरी करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानचा हा प्रयत्न फसला याबाबत देखील व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचादिल्लीत ४ दहशतवादी घुसले; हाय अलर्ट जारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -