घरताज्या घडामोडीप्रवाशांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे २०० वंदे भारत ट्रेन्स आणणार

प्रवाशांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे २०० वंदे भारत ट्रेन्स आणणार

Subscribe

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चांगल्या सुविधा आणि प्रचंड वेग यामुळे भारतीय रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या पसंतीत उतरली आहे. अशातच आता भारतीय रेल्वे या एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मोठा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चांगल्या सुविधा आणि प्रचंड वेग यामुळे भारतीय रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या पसंतीत उतरली आहे. अशातच आता भारतीय रेल्वे या एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयनुसार आता भारतीय रेल्वे स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा विचारात आहे. भारतीय रेल्वेने 200 स्लीपर वंदे भारत एक्सप्रेससाठी निविदा जारी केल्या आहेत.

या निविदेत एक्स्प्रेसचे डिझाइन, निर्मिती आणि देखभाल यांचा समावेश आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपग्रेडेशनसाठी रेल्वेने काढलेल्या निविदेची अंतिम तारीख रेल्वेने २६ जुलै २०२२ ही निश्चित केली आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचे सर्व डबे वातानुकूलित असतील. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मध्यम आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणार आहे.

- Advertisement -

रेल्वेच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदेबाबत असे सांगण्यात आले की, सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपग्रेडेशनचे काम महाराष्ट्रातील लातूर किंवा चेन्नई येथे असलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये केले जाईल. रेल्वेने दिलेल्या माहिनुसार, 20 मे 2022 रोजी पहिली प्री-बिड परिषद होणार आहे. स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसच्या पुर्णपणे तयार होऊन डिलीव्हर करण्याची मुदत 6 वर्षे 10 महिने असेल.

कंपनी या कालावधीत 200 ट्रेन तयार करेल. 16 डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 1 फर्स्ट एसी, 4 सेकंड एसी आणि 11 थर्ड एसी कोच असतील. 20 कोच असलेल्या स्लीपर ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, 4 सेकंड एसी आणि 15 थर्ड एसी कोच बसवण्यात येणार आहेत. या ट्रेनचा वेग 160 किमी प्रतितास असेल.

- Advertisement -

हेही वाचा – ‘राज’सभेसाठी पुणे-औरंगाबाद दौऱ्यावर, अमित ठाकरेंसह दिग्गज नेते औरंगाबादमध्ये दाखल होणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -