घरताज्या घडामोडीमेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण लांबणीवर: चोक्सीला आणण्यासाठी गेलेले भारतीय पथक डोमिनिकाहून रिकाम्या...

मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण लांबणीवर: चोक्सीला आणण्यासाठी गेलेले भारतीय पथक डोमिनिकाहून रिकाम्या हाती परतले

Subscribe

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला मुख्य सूत्रधार मेहूल चोक्सीला काही दिवसांपूर्वी डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी विविध एजेन्सींच्या अधिकाऱ्यांचे पथक डोमिनिकामध्ये पाठवण्यात आले होते. पण आता हे पथक कतार एअरवेजच्या खासगी विमानाने परतले आहे. त्यामुळे मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण लांबणीवर पडण्याची चिन्हं आहे. माहितीनुसार, चोक्सीच्या वकिलांनी डोमिनिका उच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षीकरणाची याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने गुरुवारी चोक्सीच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली होती. ज्यानंतर विमानाने ३ जूनला स्थानिक वेळेनुसार ८.०९ वाजता डोमिनिकाच्या मेलविले हॉल विमानतळावरून उड्डान केले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले आहे.

- Advertisement -

भारत सरकारकडून संपूर्ण ताकद मेहूल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी लावली जात आहे. चोक्सीला आणण्यासाठी डोमिनिकाला बम्बार्डीयर ग्लोबल जेट ५०० पाठवण्यात आले होते, जे कतार एअरवेजकडून भाड्याने घेण्यात आलेले. या विमानाचा खर्च जवळपास १.३५ कोटी ते १.४३ कोटी पर्यंत झाला आहे. एवढी तयारी करूनही चोक्सी काही हाती लागला नाही आहे.

सीबीआयच्या उप महानिरीक्षक शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे पथक चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी जवळपास डोमिनिकामध्ये सात दिवस राहिली. पण गुरुवारी चोक्सीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेवर सुनावणी स्थगित करण्यात आली. स्थानिक माहितीनुसार, आता पुढील सुनावणी एक महिन्यानंतर केली जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान चोक्सी डोमिनिकामध्येच राहणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  छगन भुजबळ यांनी आंदोलनासाठी केली होती दुबईच्या व्यापार्‍याची वेशभूषा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -