Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश corona pandemic: भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसा कालावधीत ३१ ऑगस्टपर्यंत वाढ, गृहमंत्रालयाची...

corona pandemic: भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसा कालावधीत ३१ ऑगस्टपर्यंत वाढ, गृहमंत्रालयाची माहिती

Related Story

- Advertisement -

देशाच्या गृह मंत्रालयाने आज, शुक्रवारी भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसाचा कालावधीत ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना व्हायरसमुळे व्यावसायिक उड्डाणे रद्द केल्यामुळे वैध व्हिसावर मार्च २०२० पूर्वी भारतात आलेल्या अनेक परदेशी नागरिकांना येथे अडकून राहावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे परदेशी नागरिकांना व्हिसा वाढविण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने आज पुन्हा हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही गृहमंत्रालयाने एक आदेश जारी केला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की, भारतीय व्हिसा किंवा मुक्कामाचा कालावधी निश्चित आहे. अशा परदेशी नागरिकांना सामान्य आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे संचालन पुन्हा सुरू केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांसाठी विनामूल्य आधारावर वैध मानले जाईल. मात्र परदेशी नागरिक मासिक आधारावर त्यांचा व्हिसा वाढविण्यासाठी तसेच त्याच्या वास्तव्याच्या मुदतीच्या कालावधीसाठी अर्ज करीत आहेत.

गृह मंत्रालयाच्या मते, सामान्य व्यावसायिक उड्डाण संचालन पुन्हा सुरू न करण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने आता या प्रकरणावर पुनर्विचार केला आहे. यानुसार, भारतीय व्हिसा किंवा परदेशी नागरिकांच्या मुक्कामाचा कालावधी कोणत्याही ओवरस्टे पेनल्टीशिवाय विनाशुल्क ३१ ऑगस्टपर्यंत मान्य असेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या परदेशी नागरिकांना व्हिसाच्या मुदतीसाठी संबंधित एफआरआरओ / एफआरओकडे कोणताही अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

- Advertisement -

हे परदेशी नागरिक संबंधित एफआरओ / एफआरओ येथे देश सोडण्यापूर्वी देशाच्या बाहेरील परवानगीसाठी अर्ज करू शकतात, ज्याला कोणत्याही ओवरस्टे पेनल्टीशिवाय विनाशुल्क मोफत दिले जाणार आहे. दरम्यान, भारतातील कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर, हळूहळू सर्व व्यवहार सामान्य होऊ लागले होते, परंतु अचानक यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव पसरला आणि देशाला पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. यावर मात करण्यासाठी बरीच राज्ये आणि शहरांमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले आहे.


 

- Advertisement -