घरदेश-विदेशभारताचा ऐतिहासिक वारसा स्कॉटलंडकडून मिळणार परत; एकूण 7 कलाकृतींचा समावेश

भारताचा ऐतिहासिक वारसा स्कॉटलंडकडून मिळणार परत; एकूण 7 कलाकृतींचा समावेश

Subscribe

भारताला शेकडो वर्षांचा गौरवशाली आणि वैभवशाली इतिहास लाभल आहे. इतिहासातील अनेक कलाकृती किंवा पुरावे आजही प्राध्यान्याने जतन केले जातात. दरम्यान स्कॉटलंड मधील ग्लासगो येथील वस्तू संग्रहालयात भारताच्या भव्य – दिव्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या काही कलाकृती आहेत. त्या कलाकृती आता भारतात परत आणण्यात येणार आहेत.

स्कॉटलंड मधील ग्लासगो येथील वस्तू संग्रहालयात असलेल्या भारतीय कालाकृती पुन्हा भारतात आणण्यात येणार आहेत. त्यात एक पारंपरिक तलवार सुद्धा आहे जी 14 व्या शतकातील आहे असे मानले जाते. युकेमधील भारताचे कार्यवाहक उच्च अधिकारी सुजित घोष यांच्या उपस्थितीत केल्व्हिंग्रोव्ह आर्ट गॅलरी आणि संग्रहालयात या करारावर औपचारिक रित्या स्वाक्षरी सुद्धा करण्यात आली.

- Advertisement -

हे ही वाचा – ओबीसी आरक्षणाची सुनावणी आता विशेष खंडपीठात

1) एक वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, स्कॉटलंड मधील ग्लासगो संग्रहालयाने भारत सरकार सोबत शुक्रवारी एक करार केला. त्या करारात नमूद करण्यात आल्याप्रमाणे चोरी झालेल्या 7 कलाकृती भारतात परत पाठविल्या जातील. ज्या कलाकृती परत पाठविल्या जाणार आहेत त्यापैकी एक बलूआ दगडाची कलाकृती सुद्धा आहे.

- Advertisement -

 

2) या करारामुळे आता सात प्राचीन कलाकृती भारतात परत येण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामध्ये पारंपरिक अशा एका तलवारीचा सुद्धा समावेश आहे ही तलवार 14 व्या शतकातील आहे असे मानले जाते. याशिवाय कानपूरमधील मंदिरातून नेलेला 11व्या शतकातील दगडी कोरीव दरवाज्याचा सुद्धा त्यात समावेश त्यात आहे.

हे ही वाचा –  जाहिरातीमुळे हृतिक रोशन वादाच्या भोवऱ्यात; पुजाऱ्यांकडून माफीची मागणी

3) स्कॉटलंड मधील ग्लासगो या संग्रहालयाचे संचालन करणाऱ्या धर्मादाय संस्थेने या वर्षाच्या सुरुवातीलाच कलाकृती सुपूर्द करणार आहोत असे असल्याचे बोललेले जात आहे. यूकेमधील कार्यवाहक भारतीय उच्च अधिकारी सुजित घोष यांच्या उपस्थितीत केल्व्हिंग्रोव्ह आर्ट गॅलरी आणि संग्रहालयात य अकरारासंबंधीची संपूर्ण औपचारिकता पूर्ण करण्यात आली. त्याचसोबत सूर्यदेवाची काळ्या पाषाणातील मूर्ती सुद्धा भारताला परत करण्यात येणार आहे.

 

4) ब्रिटनमधील भारतीय उच्च अधिकारी सुजित घोष या संदर्भांत म्हणाले, ग्लासगो असलेल्या आमच्या भागीदारीमुळे ग्लासगो संग्रहालयातून भारतीय कलाकृती भारतात आणण्याचा जो निर्णय आम्ही घेतला त्याचा आम्हाला आनंद आहे. ज्यांच्यामुळे हे शक्य झाले त्या सर्वांचे आभार सुद्धा सुजित घोष यांनी व्यक्त केले.

 

5) दरम्यान या सर्व कलाकृती ग्लासगोच्या संग्रहालयांना भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. या सर्व वस्तू कानपूर, कोलकाता, ग्वाल्हेर, बिहार आणि हैदराबाद अश्या भारताच्या विविध राज्यात येथील असल्याचे ग्लासगो म्युझियमने सांगितले. त्यापैकी काही कलाकृती सुमारे 1,000 वर्षे जुने आहे असेही मानले जाते.

हे ही वाचा –  शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय; एमएसपी पारदर्शकतेसाठी समितीची स्थापना

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -