घरदेश-विदेशदिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, समोर आले 'हे' कारण

दिब्रुगडला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, समोर आले ‘हे’ कारण

Subscribe

आसाममधील गुवाहाटीहून दिब्रुगडला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान रविवारी सकाळी टेक ऑफच्या काही मिनिटांतच गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा परतल्याने एकच खळबळ उडाली.

आसाममधील गुवाहाटीहून दिब्रुगडला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान रविवारी सकाळी टेक ऑफच्या काही मिनिटांतच गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा परतल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी विमानामध्ये एक केंद्रीय मंत्री आणि राज्यातील भाजपचे दोन आमदार प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. (IndiGo flight Emergency landing to Dibrugarh)

हेही वाचा – Odisha Train Accident : रेल्वेरुळांच्या देखभालीच्या खर्चात कपात, सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

- Advertisement -

विमान क्रमांक 6E2652 ने गुवाहाटीहून सकाळी 8.40 वाजता उड्डाण केले आणि सुमारे 20 मिनिटांतच हे विमान पुन्हा विमानतळावर परतले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान परत गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले, असे सांगण्यात आले आहे. यावेळी विमानामध्ये इतर प्रवाशांसह केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि आसाममधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दोन आमदार प्रशांत फुकन आणि तेरोश गोवाला यांचा समावेश होता.

गुवाहाटी येथे या विमानाची इमर्जन्सी लँडींग केल्यानंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांना डी-बोर्ड करण्यात आले आणि विमान तपासणीसाठी पाठवण्यात आले. तांत्रिक बिघाड झाल्यानंतर या विमानाला सुरक्षितरित्या उतरविण्यात आले असल्याच्या बातमीला दुजोरा देण्यात आलेला आहे. पण या घटनेनंतर इंडिगोच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

याबाबत बोलताना दिब्रुगडचे आमदार प्रशांत फुकन यांनी सांगितले की, ‘आम्ही गुवाहाटीहून उड्डाण केले तेव्हा कोणतीही अडचण आली नाही, परंतु 20 मिनिटांनंतर विमान गुवाहाटीला परत आले आणि लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आम्हाला एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांनी कळवले की विमानात काही तांत्रिक समस्या आहे, त्यामुळे विमानाला परतावे लागले.’

मागील महिन्यात 25 मेला मंगळुरूहून दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षाने धडक दिल्यानंतर मोठा अपघात टळला आहे. पक्षी धडकल्यानंतर इंडिगोच्या विमानातून प्रवास करणाऱ्या 160 हून अधिक प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर हे विमान एप्रनकडे वळवण्यात आले, त्यामुळे एका आठवड्यात दोन ठिकाणी इंडिगो विमानाचे दोन मोठे अपघात टळल्याचे बोलले जात आहे.

तर त्याआधी मे महिन्यातच नागपूर-पुणे इंडिगोचे विमान 63135 हे टेक ऑफ करताना 10 दिवसांपूर्वी एका पक्ष्याची धडक बसल्याने उड्डाण रद्द करण्यात आले होते. हे विमान दुपारी 3.30 वाजता रिशेड्यूल करण्यात आले. तोपर्यंत प्रवाशांना पॅसेंजर लाऊंजमध्ये बसविण्यात आल्यामुळे त्यांची गैरसोय झाली आणि मनस्ताप सहन करावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -