घरदेश-विदेशवाजपेयी; इंदिरा गांधी आणि 'दुर्गा'!

वाजपेयी; इंदिरा गांधी आणि ‘दुर्गा’!

Subscribe

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटल बिहारी वाजपेयी यांनी दुर्गेची उपमा दिली होती. ही चर्चा आजही राजकीय वर्तुळात रंगते. मात्र अटलजी खरच असे बोलले होते का, काय आहे या मागचं नेमकं कारण. जाणून घेऊया.

देशातील दोन प्रमुख पक्षांमधील राजकीय मतभेद वारंवार नागरिकांच्या समोर आले आहे. मात्र जेव्हा जेव्हा एखाद्या नेत्याची त्याच्या कौशल्य आणि निर्णयक्षमतेसाठी स्तुती करण्याची वेळ आली आहे, विरोधी पक्षातील नेतेही मागे राहिलेले नाही. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अशाच एक प्रतिभावंत आणि मुसद्दी नेत्या होत्या. त्यांच्या कौशल्य आणि देशहितासंबंधीच्या निर्णयाबाबत विरोधी पक्षातील अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटल्याची चर्चा कित्येक काळापासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र त्यांनी खरंच हे वक्तव्य केलेला का, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

काय आहे हे प्रकरण

१९७१ साली भारत – पाकिस्तान युध्द झाले होते. या युध्दात पाकिस्तानची चांगलीच धुळधाण उडाली. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर पाकिस्तान वेगळा झाला होता. तेव्हापासून बांगलादेश हा पाकिस्तानच्या अधिपत्याखाली होता. मात्र बांगलादेशींना आपला स्वतंत्र देश हवा होता. १९७१ च्या युध्दानंतर ते साध्य झाले. पाकिस्तान भारतासमोर सपशेल हरला आणि या देशाचे दोन तुकडे झाले. स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे हे यश इतके अद्वितीय होते की, देशभर त्याचे कौतुक होत होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना लोकभेत ‘दुर्गा’ म्हटले. त्यांचे हे भाषण तेव्हाच्या वृत्तपत्रांतही प्रसिद्ध झाले होते. त्याकाळी संसदेतील कामकाजाच्या रेकॉर्डिंगची व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य रेकॉर्ड होऊ शकले नाही.

- Advertisement -

या बातमीने राजकीय क्षेत्रात खळबळ

९० च्या दशकात राजकारणाची दिशा बदलल्यानंतर वाजपेयी यांच्या या वक्तव्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले. वाजपेयी खरोखर असे बोलले होते का, याबाबत संभ्रम निर्माण झाला. जाणकारांच्या मते, वाजपेयी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसला फायदा होत आहे, अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटू लागली होती. भाजप सत्तेच्याजवळ आल्यानंतर वाजपेयी यांचे हे वक्तव्य भाजपला अधिक जाचक वाटू लागले. काँग्रेसमधूनही या वक्तव्याचा लाभ उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे वाजपेयींनी इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा दिलीच नव्हती, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली.

अडवाणींच्या आत्मचरित्रात वक्तव्याचे खंडन

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ‘मेरा देश, मेरा जीवन’ या आपल्या आत्मचरित्रात या वक्तव्याचे खंडन केले आहे. इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा वाजपेयी यांनी नव्हे, तर अन्य एका सदस्याने दिली होती, असे अडवाणी यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. या पुस्तकाला स्वत: वाजपेयी यांनीच प्रस्तावना लिहिली आहे. दरम्यान, वाजपेयी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ‘दुर्गा’ वक्तव्याचे खंडन केले होते. त्यांनी म्हटले की, १९७१ च्या युद्धातील विजयाबद्दल मी इंदिरा गांधी यांचे कौतुक नक्कीच केले होते. मात्र त्यांना दुर्गेची उपमा दिलेली नव्हती. पण दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांत मी त्यांना दुर्गा म्हटल्याचे छापून आले. हे कसे घडले मला माहिती नाही.

वाचा ः वाजपेयींना सेलिब्रिटींची ट्वीटरवरून श्रद्धांजली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -