घरदेश-विदेशवाजपेयींना सेलिब्रिटींची ट्वीटरवरून श्रद्धांजली

वाजपेयींना सेलिब्रिटींची ट्वीटरवरून श्रद्धांजली

Subscribe

सेलिब्रिटींनी दिवगंत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ट्वीटरच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे. काहींही कवीतांच्या ओळी तर काहींनी भावनिक संदेश लिहून अटलजींना आदरांजली अर्पित केली आहे.

दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ राजकीय नेताच नव्हे तर उत्तम साहित्यिकही होते. त्यांना कवितांसोबत कलेची, साहित्याची तेवढीच आवड होती. आज देशाने एक चांगला राजकीय सल्लागारच नव्हे तर कलेची जाण असलेला कवी मनाचा हळवा वक्ता गमावल्याच्या भावना सिनेसृष्टीतील मान्यवरांनी व्यक्त होत आहेत. बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी ट्वीटरवरून त्यांना श्रद्धांजली दिली आहे.


किंग खान शाहरुखने अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेच्या व्हिडिओमध्ये काम केले होते. या कवितांना गझल गायक जगजीत सिंग यांनी स्वरबद्ध केले होते. शाहरुख खान यानेही कवी अटलजींना श्रद्धांजली देत संदेश लिहिला आहे.

- Advertisement -


आपल्या देशाची प्रतिमा परदेशांमध्येही उंचावत जावी यासाठी अटलजी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. तशीच कामगिरी सध्या बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलीवूड क्षेत्रात करत आहे. तिनेही ट्वीटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -