घरCORONA UPDATECoronaVirus: या देशाने केला कोरोनावरची लस शोधण्याचा दावा

CoronaVirus: या देशाने केला कोरोनावरची लस शोधण्याचा दावा

Subscribe

कोरोनावर कायमचा तोडगा काढण्यासाठी जगभरातील विविध प्रयोग शाळेत त्यावर लस बनवण्यासाठी संशोधन केले जात आहे. मात्र आता इस्त्राइल देशाने त्यांच्या प्रयोग शाळेत त्यावर लस शोधून काढल्याचा दावा केला आहे. खरंतर इस्त्राइल हा देश घातक बॉम्ब बनवण्यासाठी ओळखला जातो. परंतू आता जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून या देशानेही त्यावर लस शोधण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण जगभरात वाढत आहेत. त्यावर लवकरात लवकर लस यावी अशी अपेक्षा सगळेच करत आहेत. अशावेळी इस्त्राइल या देशाने लस बनवण्याचा दावा केला असून यांची घोषणा संरक्षण मंत्री नफताली बेन्नेट यांनी केला आहे.

हेही वाचा – समन्वयाचा अभाव आणि यंत्रणांमधील गोंधळ

- Advertisement -

गुप्तपणे प्रयोग शाळेत संशोधन सुरू 

शरिरात असलेल्या कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी सक्षम असलेल्या या लसमध्ये हा विषाणू शरिरात इतरत्र पसरण्यापासूनही रोखू ठेवण्याची क्षमता आहे. इस्त्राइलच्या डिफेंस बायोलॉजिकल इंस्टिट्युटमध्ये कोरोना विषाणूवरील लसीचे संशोधन केले जात आहे. येथील ही प्रयोग शाळा जैविक आणि रासायनिक शस्त्र बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. इस्त्राइलमधील ही प्रयोग शाळा दक्षिणी तेलअबीबपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या नेस जिओना येथे आहे. ही प्रयोग शाळा जमिनी अंतर्गत खोलवर बनवण्यात आली आहे. इथे खतरनाथ विष आणि विषाणू बनवले जातात. त्याचा वापर इस्त्राइल गुप्तचर एजन्सी मोसाद त्यांच्या शस्त्रूंना मारण्यासाठी करतात. या प्रयोग शाळेवरून कोणत्याही विमानाला मार्गस्थ होण्याची परवानगी नाही. तसेच याचा मुख्य दरवाजा हा बॉम्ब प्रूफ बनवण्यात आला आहे. या प्रयोग शाळेबाबत कोणत्याही नकाशात त्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. इस्त्राइलने संशोधन केलेल्या लसीचे पेटंट करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर त्याला सार्वजनिक उप्तादनासाठी खुले केले जाणार असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -