घरदेश-विदेशISRO कडून देशाच्या सर्वात छोट्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ISRO कडून देशाच्या सर्वात छोट्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Subscribe

इस्रोने देशाच्या सर्वात छोट्या SSLV-D1 उपग्रहाचे आज यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले आहे. आज सकाळी 9.18 मिनिटांनी त्याचे पहिले प्रक्षेपण करण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 1 वरून हे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्मॉल सॅटलाईट लॉंच व्हेईकलची (SSLV) निर्मिती केली आहे. एसएसएलवी च्या माध्यमातून इस्रोने EOS-02 मिशनचे प्रक्षेपण केले.

EOS02 हा ऑब्जरवेशन सॅटेलाईट आहे. जे 10 महिने अंतराळात काम करेल. त्याचे वजन 142 किलो आहे. यात मिड आणि वेवलेंथचा इन्फ्रारेड कॅमेरा आहे. ज्याचे रेझोल्यूशन 6 मीटर आहे. म्हणजेच रात्रीच्या वेळीही ते निरीक्षण करू शकते. याशिवाय SpaceKidz India या अंतराळ संस्थेचा विद्यार्थी उपग्रह Azadsat ला प्रक्षेपित करण्यात आला.

- Advertisement -

हा उपग्रह नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जो फॉरेस्ट्री, अॅग्रीकल्चर. जियोलॉजी, आणि हाइड्रोलॉजी यांसारख्या क्षेत्रात काम करेल, परंतु विशेष म्हणजे हे प्रक्षेपण व्हीकल, PSLV पेक्षा लहान तर आहेच शिवा त्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, जी भविष्यात वाढत्या सर्वात लहान उपग्रह मार्केटमध्ये प्रभावी सिद्ध होईल. ज्यामध्ये आपले स्वतःचे आणि परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले जातील.

- Advertisement -

PSLV चा लोड होणार कमी

यामुळे शक्तिशाली PSLV लहान उपग्रहांच्या लोडमधून मुक्त होईल, कारण त्याचे सर्व काम आता SSLV द्वारे केले जाईल. अशा स्थितीत पीएसएलव्ही मोठ्या मोहिमेसाठी तयार होईल. तर SSLV पृथ्वीच्या कमी कक्षेत छोटे उपग्रह ठेवण्यास सक्षम असेल. रविवारी सकाळी 9.18 वाजता श्रीहरिकोटा येथून या मोहिमेचे प्रक्षेपण झाले आहे.

SSLV ची वैशिष्ट्ये

एसएसएलव्ही हे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांचे ब्रेन चाइल्ड आहे. SSLV आपल्यासह 500 किलो वजनाचा पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे, जो उपग्रहाला 500 किमी उंचीवर कक्षेत ठेवेल. त्या तुलनेत पीएसएलव्ही 1750 वजनाचा पेलोडला सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये म्हणजेच 600 किमी वरच्या कक्षेत ठेवू शकतो.

सॅटेलाइट मार्केटवर  नजर

या काळात मिनी, नॅनो आणि नॅनो उपग्रह प्रक्षेपित करण्याची मागणी व्यावसायिक बाजारपेठेतही जास्त आहे, त्यामुळे या प्रक्षेपणांसाठी SSLV हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, यात शंका नाही. 110 किलो वजनाचे SSLV हे तीन टप्प्याचे रॉकेट आहे, ज्याचे सर्व भाग घन अवस्थेचे आहेत. हे केवळ 72 तासांत एकत्र केले जाऊ शकते. तर उर्वरित प्रक्षेपण वाहनाला सुमारे दोन महिने लागतात. वाढत्या लहान उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेचा विचार करून SSLV ला आगामी काळात एक उत्तम प्लेअर स्पेस सेक्टर बनवले जाऊ शकते.


उद्धव ठाकरे एकाकी !

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -